सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिवप्रेमींवर दाखल असलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी

क्षत्रिय मराठा युवा सेनेचे गृहमंत्री अनिल देशमुखांना निवेदन

Sudarshan MH
  • Nov 1 2020 4:36PM



नंदुरबार-  नगरपालिकेच्या जुन्या जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात यावा, या मागणीसाठी आंदोलन आणि शिवजयंतीनिमित्त शहरात मोटारसायकल रॅली 2017 मध्ये काढण्यात आली होती. परंतू आंदोलन व रॅली काढल्याप्रकरणी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात शिवप्रेमींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. शिवसैनिकांवर दाखल असलेले सदरचे गुन्हे शासनाने मागे घ्यावेत, अशी मागणी नंदुरबार येथील क्षत्रिय मराठा युवा सेनेचे अध्यक्ष प्रविण महेश मराठे यांनी केली आहे.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे नंदुरबार जिल्हा दौर्‍यावर आले होते. यावेळी शहादा येथे क्षत्रिय मराठा युवा सेनेचे अध्यक्ष प्रविण मराठे यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची भेट घेवून निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, सन 2017 मध्ये शिवजयंतीनिमित्त शिवप्रेमींनी शहरात शिवमय वातावरण निर्मितीसाठी मोटारसायकल रॅली काढली होती. परंतू नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात त्यावेळी मोटारसायकल रॅली काढल्याप्रकरणी शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच नंदुरबार नगरपालिकेच्या जुन्या इमारतीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असल्याने त्याठिकाणी व्यापारी संकुल बांधण्यात आले. म्हणून पालिकेच्या जुन्या जागेवरच शिवरायांचा पुतळा बसविण्यात यावा, या मागणीसाठी 2017 मध्ये शिवप्रेमींसह शिवसैनिकांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत नगरपालिका प्रशासनाने सदर ठिकाणी सुशोभित चबुतरा बांधून छत्रपती शिवाजी महाराजांचा अर्धाकृती पुतळा बसविला. परंतू आंदोलन केल्याप्रकरणी पोलिसांनी शिवप्रेमी व शिवसैनिकांवर गुन्हे दाखल होते. म्हणून शासनाने शिवप्रेमींवर दाखल असलेले गुन्हे मागे घ्यावेत, अशी मागणी नंदुरबार येथील क्षत्रिय मराठा युवा सेनेचे अध्यक्ष प्रविण महेश मराठे यांच्यासह पप्पु मराठे, छोटू कासार, यशराज मराठे, राहूल मराठे, आकाश पाटील व पदाधिकार्‍यांनी 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार