सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वसई विरार महानगरपालिकेतील गैरहजर कर्मचाऱ्यांवर मा.आयुक्तांची कारवाई

वसई विरार शहर महानगरपालिकेने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखने कामी उपाययोजना म्हणून कोरोना विषाणूचा संसर्ग झाले

Manish Gupta
  • Jul 18 2020 9:55AM

मनीष गुप्ता 

 विरार  :-  वसई विरार शहर महानगरपालिकेने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखने कामी उपाययोजना म्हणून कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले रुग्ण व संशयित व्यक्तींसाठी शहरातील विविध ठिकाणी अलगीकरण व विलगीकरण केंद्र उभारलेली आहेत. वसई विरार शहर महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या एकूण ४६६ कायम सफाई कर्मचाऱ्यांपैकी २०० सफाई कर्मचाऱ्यांची व  ठेका पद्धतीने घेतलेल्या ठेका मजुरांची महानगरपालिकेच्या अलगीकरण व विलगीकरण केंद्रामध्ये रुग्णांच्या सेवेसाठी नेमणूक कऱण्यात आली आहे. परंतु सदर कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचारी नेमून दिलेल्या केंद्रात हजर झालेले नसल्यामुळे तसेच काही कर्मचारी रजा मंजूर न करता परस्पर गैरहजर राहत असल्यामुळे अलगीकरण व विलगीकरण केंद्रात रुग्णांची गैरसोय होत असल्याचे मा.आयुक्त यांच्या निदर्शनास आल्यामुळे या संदर्भात दि.१६ जुलै २०२० रोजी महानगरपालिका मुख्यालय विरार येथे मा.आयुक्त व मा.अतिरिक्त आयुक्त यांनी अलगीकरण व विलगीकरण केंद्राची जबाबदारी नेमून दिलेल्या स्वछता निरीक्षक, मुकादम व पर्यवेक्षक यांची आढावा बैठक आयोजित केलेली होती. काही सफाई कामगार व ठेका मजूर सदर केंद्रात रुग्णांच्या सेवेसाठी नेमणूक झाल्यापासून कामावर हजर झालेले नसल्याचे व काही कर्मचारी रजा मंजूर न करता परस्पर गैरहजर राहत असल्याचे तसेच स्वछता निरीक्षक व मुकादम यांचेही अलगीकरण व विलगीकरण केंद्रातील नियोजनावर योग्य नियंत्रण नसल्याचे बैठकीत घेतलेल्या माहीती नुसार मा.आयुक्त यांचे निदर्शनास आले. त्यामुळे अशा कामचुकारपणा करणाऱ्या ६ कायम सफाई कर्मचाऱ्यांना तात्काळ निलंबित करून त्यांची तात्काळ विभागीय चौकशी करण्याचे व ९ ठेका मजुरांना सेवेतून कमी करण्याचे आदेश मा.आयुक्त यांनी दिले. तसेच बेजबाबदारपणा बद्दल १ वरिष्ठ स्वछता निरीक्षक, १ लिपिक तथा प्रभारी स्वछता निरीक्षक व १ मुकादम यांना कारणे दाखवा नोटीसा देण्यात आल्या असून त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येईल तसेच जे कर्मचारी आजारपणाचे कारण देऊन गैरहजर राहिले आहेत त्यांची वैद्यकीय मंडळाकडुन ते सेवा करण्यास वैद्यकीय दृष्ट्या सक्षम आहेत का याची तपासणी करून घेण्याचे आदेशही मा.आयुक्त यांनी संबंधित विभागास दिले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार