सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुणे पिंपरी चिंचवड शहरात पिस्तुल विकणाऱ्या टोळीतील 15 जनांना अटक, 20 लाखांचे 42 पिस्तुल जप्त पिंपरी-चिंचवड पोलिसाची मोठी कर्यवाही

आज पर्यंतची सर्वा मोठी कारवाई करण्यात पिंपरी चिंचवड आयुक्तालयात युनिट ४ ला यश आले

Deepak Chauhan
  • Jul 16 2020 2:36PM


-पुणे व पिपरी चिंचवड शहरातील
 आज पर्यंतची सर्वा मोठी कारवाई करण्यात पिंपरी चिंचवड आयुक्तालयात युनिट ४ ला यश आले आहे.ही कारवाई आता पर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.या कारवाईत पोलिसांनी 15 आरोपींना अटक केली आहे तर 42 पिस्तुल व 66 जिवंत काडतुसे जप्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार मागील आठवड्यात पिंपरी चिंचवड मधील सांगवी येथून एका इसमाला अवैध हत्यार बाळगल्या प्रकरणी अटक करण्यात आली होती.त्याच्या तपासात माहिती समोर आली की अश्याच प्रकारचे मोठे रॅकेट शहरात सक्रिय आहे जे मध्यप्रदेश मधून बनावटी पिस्तुल महाराष्ट्रात तसेच पुणे,पिंपरी चिंचवड मध्ये विक्री साठी मोठ्याया प्रमाणात आणले जाते पोलिसांनी याचे गांभीर्य पाहता तत्काळ काही पथके तयार केल्या तपासा दरम्यान पोलिसांचे एक पथक मध्यप्रदेश मध्ये जाऊन काही दिवस तेथे वेषांतर करून राहिले व आरोपींची संपूर्ण माहिती घेतली या काळात लॉकडाऊन लागू झाल्याने पोलिसांना मोठी अडचण देखील निर्माण झाली होती परंतु तरी देखील वेषांतर करून मिळालेल्या माहिती नुसार पोलिसांना मुख्य आरोपीला मध्य प्रदेश मधून अटक करण्यात यश आले तर पुढील तपासात पुणे व आसपासच्या भागातून पोलिसांनी इतर आरोपीना अटक केली आहे. सध्या पोलिसांनी एकूण 15 आरोपी अटक केली असून अन्य 11 आरोपींच्या मागावर पोलीस आहेत.पुणे शहरातील आज पर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्यामुळे पोलिसांचे या कारवाई नंतर सर्वच स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.

ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई,अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ,सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील,यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट। ४चे वरिष्ट पोलीस निरीक्षक मोहन शिंदे,सहायक पोलिस निरीक्षक अंबरीश देशमुख,पो.ह.प्रवीण दळे, नारायण जाधव,संजय गवारे,धर्मराज आवटे,दादाभाऊ पवार,आदिनाथ मिसाळ,पो.नाईक.संतोष असवले,तुषार शेटे,लक्ष्मण आढारी, गौस नदाफ,वासुदेव मुंडे,शावरसिद्ध पांढरे,प्रशांत सैद,सुनील गुट्टे,तुषार काळे,सुरेश जायभाये, अजिनाथ ओंबासे, धनाजी शिंदे,सुखदेव गावंडे, नागेश माळी,राजेंद्र शेटे यांच्या पथकाने केले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार