सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पुन्हा एकादा " लॉकडाऊन

कोविड-१९ च्या विषाणूमुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य रोगावर प्रतिबंध आणि नियंत्रण आणण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने पुन्हा एकादा लॉकडाऊन वाढवला आहे

Aishwarya Dubey
  • Jul 14 2020 7:53PM


पनवेल : कोविड-१९ च्या विषाणूमुळे उद्धवलेल्या संसर्गजन्य रोगावर प्रतिबंध आणि नियंत्रण आणण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने पुन्हा एकादा लॉकडाऊन वाढवला आहे. आता २४ जुलै रोजी रात्री १२.०० वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असणार आहे. शहरातील सर्व नागरिकांनी लॉकडाऊन आदेशात नमूद आणि उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन पालिकेच्यावतीन करण्यात आले आहे.

पनवेल पालिकेने याआधी ३ जुलै ते १४ जुलै दरम्यान लॉकडाऊन जाहीर केला होता. आज हा लॉकडाऊन संपणार होता. मात्र, कोविडाचा प्रादुर्भाव सुरुच असल्याने आणि कोरोना बाधितांचा आकडा वाढत असल्याने लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय पालिका आयुक्तांनी घेतला आहे.

दि. १३ जुलै २०२० रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत एकूण रुग्ण १३८८ असून पूर्णपणे बरे झालेले रुग्ण २४९६ आहेत. काल १४६ रुग्णांची भर पडले. तर आतापर्यंत ९६ लोकांचा बळी गेला आहे. ४५० लोकांचे अहवाल प्रलंबित असून आतापर्यत १०१३१ नागरिकांची कोविड-१९ची चाचणी करण्यात आली आहे. पालिका हद्दीत एकूण कोरोनाचे रुग्ण ३९८० इतके झाले आहेत.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधितांचा आकडा चार हजारांच्या घरात पोहोचला आहे. लॉकडाऊन असताना नागरिक घराबाहेर पडत असल्याने लॉकडाऊन कडक करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तोडाला मास्क वापरणे बंधककारक असणार आहे.  यामध्ये कोरोनावर मात करण्यासाठी म्हणून अनेक परिसरांमध्ये कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच काही भागांमध्ये कडक लॉकडाऊनची अधिकृत घोषणा करण्यात यावी अशी मागणीही   स्थानिकांनी केली होती. 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार