सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मंदिरे उघडण्यासाठी विश्व हिंदू परिषदवतीने ढोल वाजवा महाराष्ट्र सरकार जागवा आंदोलन...

महाराष्ट्र सरकार जागवा आंदोलन...

Sudarshan MH
  • Oct 26 2020 12:37PM
प्रतिनिधि दिपक चव्हाण पुणे 

 महाराष्ट्र राज्यात दर्शनासाठी मंदिरे उघडण्यात यावेत यासाठी विश्व हिंदू परिषदेने पुढाकार घेतला असून. कोरोना महामारी आपदाच्या काळात लॉकडाऊनच्या पार्श्भूमीवर गेली आठ महिने बंद असलेली मंदिरे भक्तांना दर्शनासाठी तातडीने उघडावीत नाहीतर विश्व हिंदू परिषद तीव्र आंदोलन करेल असा इशारा परिषदेचे केंद्रीय मंत्री शंकरजी गायकर यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत दिला होता, वेळोवेळी महाराष्ट्र सरकारला मंदिरे उघडण्यात बाबत निवेदन देवून ही जाग आली नाही या काळात "उघडी मदिरा, बंद मंदिर" सरकारच्या या भूमिकेवर विहिंपने आंदोलन करण्याचा इशारा दिला.  गेली चार महिने टप्प्याटप्प्याने का होईना सर्व व्यवहार सुरू झाले आहेत सर्व बाजारपेठा,  भाजीबाजार,  मॉल.,  सर्व दुकाने, बँका सर्व खाजगी सरकारी कार्यालय,  कंपन्या, कारखाने सगळेच व्यवस्थित सुरू आहे, सर्व ठिकाणी प्रचंड गर्दी ही ओसंडून वाहत आहे  लोकल  मधील गर्दी पूर्वीसारखेच प्रचंड झालेले आहे. दो गज दुरिके अंतर कोठेच पाळले जात नाही. दसऱ्याला तर व्यायाम शाळा सुरू होत आहेत स्पर्धा परीक्षा. बोर्ड परीक्षा आता घेतल्या जात आहेत नोव्हेंबरमध्ये एसएससी बोर्डाची परीक्षा आहे.  हे सगळं सुरू आहे तर मंदिरांवर सरकार रोष  का? सध्या काळात मंदिर ही तर  समाजाच्या तीव्र गरजेची झाली आहेत आर्थिक,  मानसिक व भावनिक दृष्ट्या अस्थिर  झालेल्या माणसाला देवाच्या दर्शनाने अधिक उमेदीने जगण्याचे बळ मिळते, मानसिक व भावनिक आधार मिळतो. हिंदू समाजाच्या स्थैर्याची  मंदिरे मुख्य केंद्र आहेत. मंदिरातील देवते वरील श्रद्धेने सदाचार, संयम व नीतिमत्तेचे आचरण हिंदू समाजाचे होत असते. मंदिरांवर अनेक गावांची धर्मस्थानांची अर्थव्यवस्था अवलंबून आहे. महाराष्ट्र ही जागृत धर्मस्थानांची भूमी आहे. देवींची साडेतीन शक्तीपीठ, बारा जोतिलिंगा पैकी पाच जोतिर्लिंग, अष्टविनायक मंदिरे जेजुरी, जोतिबा सारखी कुलदैवते संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज अशा अनेक संतांची कर्मभूमी, पंढरपूर सारखे महाराष्ट्राचे आराध्य दैवत, अक्कलकोट, शिर्डी सारखे श्रध्दास्थान अश्या अनेक तीर्थक्षेत्रांच्या अर्थव्यवहार सद्य कालात ठप्प झाले आहेत. मंदिरांच्या आश्रयाने असलेले अनेक छोटे-मोठे व्यवसाय बंद आहेत. गुरव, पुजारी, पुरोहित या वर्गावर उपासमारीची पाळी आली आहे.  अनेक देवालयांवर सरकारचे ट्रस्टी आहेत तेथील दानपेटीतील धन सरकारी योजनांसाठी वापरले जाते. आषाढी वारीत मा. मुख्यमंत्र्यांनी विठ्ठलाची पूजा केली. सर्वसामान्य वारकरी मात्र विठ्ठलाच्या दर्शनासाठी व्याकुळ आहे. लवकरच कार्तिक वारी येत आहे. नवरात्र काळात देवीच्या दर्शनासाठी कोट्यावधी भाविक जातात अब्जावधी रुपयांची उलाढाल या काळात मंदिरांच्या परिसरात होत असते. हजारो लोकांची वर्षभराची रोजीरोटीची व्यवस्था होत असते हे सगळे सरकारच्या निष्काळजी पणाने ठप्प  झाले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कोणत्याही निवडणुकीत सगळे छोटे मोठे पुढारी देवळात दर्शन घेऊनच प्रचार करतात. दसरा दिवाळीच महत्व हिंदू समाजासाठी अत्यंत आहे.  दसरा-दिवाळी मध्ये  देवाला साक्षी ठेवून नवीन वस्तूंची खरेदी हिंदू समाज करत असतो अशा प्रसंगी देवतेचे देवालय उघडी नसतील तर श्रद्धावान हिंदूंचे आर्थिक व्यवहारही कमी होतील, अशा विविध कारणांसाठी सर्व साधुसंत, कीर्तनकार मंदिरांचे विश्वस्त यांच्या आग्रहामुळे परिषदेने माननीय राज्यपाल,  माननीय मुख्यमंत्री, सर्व जिल्हाधिकारी,  लोकप्रतिनिधी यांना निवेदने दिली आहेत हिंदू समाज खूप संयमी आहे  माननीय मुख्यमंत्री यांनी आवाहन केले  त्याप्रमाणे दहीहंडी, गणपती  असे सगळेच महत्त्वाचे सण साधेपणाने घरातच साजरे केले आता हिंदू समाजाचा संयम संपत चालला आहे. आपल्या श्रद्धेय देवतेचे दर्शन घेता येऊ नये याची वेदना आता वाढत चालली आहे . सरकारने समाजाचा आक्रोश लक्षात घ्यावा हिंदुत्वनिष्ठ असलेल्या शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील कोट्यवधी हिंदूंच्या भावनांचा विचार करावा व या दसऱ्याला देवालये  भक्तांसाठी खुली करावीत व सरकारला जाग यावी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात या अनुषंगाने आज २४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ४ वाजता राज्यभरात घंटानाद, शंखनाद करत भजन व आरती करून "ढोल वाजावा, महाराष्ट्र सरकार जागवा" असे आंदोलन करण्यात आले त्याच प्रमाणे पिंपरी चिंचडमध्ये ही मोरया गोसावी मंदिर समोर आंदोलन घेण्यात आले या आंदोलनात विहिंप पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री, विजयराव देशपांडे, पश्चिम महाराष्ट्र प्रांत, अशोक यलमार, पश्चिम महाराष्ट्र प्रांत मातृशक्ती पालक, नंदकुमार कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड जिल्हाध्यक्ष शरदराव इनामदार, बजरंग दल पिंपरी-चिंचवड जिल्हा संयोजक नाना सावंत, सहसंयोजक अभिजीत शिंदे, संभाजी बालघरे, सागर चव्हाण, जिल्हा गोरक्षा प्रमुख मंगेश नढे, साप्ताहिक मिलन प्रमुख कृष्णा वाघमारे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.



 या आंदोलनाने सरकारला जाग आली नाही अथवा मंदिरांचे बंद दरवाजे उघडण्यात आले नाहीत तर आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा विहिंप पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री विजयराव देशपांडे यांनी दिला आहे. 


 विश्व हिंदु परिषद बजरंग दल श्री क्षेत्र देहूगाव च्या वतीने जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मंदिर समोर ही असे आंदोलन करण्यात आले या वेळी संत तुकाराम महाराजांचे वंशज, शिवाजी महाराज मोरे, विठ्ठल महाराज मोरे, रामनाना मोरे, चिंचवड विभाग बजरंग दल संयोजक संदेश भेगडे, निखिल पिंजण, ओमकार काळोखे, अमित मोरे, अशोक साकोरे,  अमित भेगडे, अजित काळोखे, शिरीष मोरे, मुकेश पाठक, दिपक अग्रवाल, मयुर हिंगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 



   विश्व हिंदु परिषद बजरंग दल तळेगाव दाभाडे प्रखंडच्या वतीने तळेगाव येथील मारुती चौकामधील श्री मारुती मंदिर समोर ही आंदोलन करण्यात आले, यावेळी विश्व हिंदु परीषद बजरंग दल तळेगाव प्रखंडचे संयोजक ओंकार भेगडे, तळेगाव प्रखंड मंत्री, कपिल देवाडिगा रा. स्व. संघाचे मावळ तालुका संघचालक शशिकांत कदम, रा. स्व. संघाचे पुणे जिल्हा कार्यवाह अविनाश भेगडे, मयुर रेडे, प्रणव दाभाडे, प्रशांत भेगडे, कुणाल जव्हेरी, हर्षद सांडभोर, प्रतिक भेगडे, आकाश ठोंबरे समवेत विश्व हिंदु परीषद बजरंग दलाचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर, आंबेगाव व श्री रोकडोबा मारुती मंदिर जुन्नर शहर येथे ही आंदोलनं करण्यात आले


 आगामी काळात महाराष्ट्र सरकारने बंद मंदिराचे दरवाजे न उघडल्यास अखंड महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि त्या आंदोलनाच्या होणाऱ्या परिणामाला महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल असे विहिंपने ठणकावले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार