सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

5 हजार 647 घरांसाठी आजपासून नोंदणी सुरु

11 डिसेंबर ते 11 जानेवारी रोजी सायंकाळी पाच पर्यंत करता येणार अर्ज नोंदणी

Abhimanyu
  • Dec 11 2020 12:14PM

मुंबई : 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या योजनेअंतर्गत पुणे विभागात 5 हजार 647 घरांसाठी म्हाडाच्या वतीने काल सोडत काढण्यात आली. उपमुख्यमंत्री कार्यालयातील समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या सदनिकांसाठी अर्ज नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, गृहनिर्माण राज्यमंत्री सतेज पाटील, गृहनिर्माण विभागाचे प्रधान सचिव एस. व्ही. आर. श्रीनिवास उपस्थित होते. 11 डिसेंबर ते 11 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज नोंदणी करता येईल.





प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजतेंतर्गत पुणे जिल्हयात महाळुंगे येथे 1880, दिवे येथे 14 तर सासवड येथे 4 सदनिका आहेत. तसेच सोलापूर जिल्हयात 82 सदनिका आहेत, अशा एकूण 1980 सदनिका आहेत. 20 टक्के सर्व समावेशक गृहनिर्माण योजनेंतर्गत पुणे महानगरपालिका येथे 410, पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे 1020 तर कोल्हापूर महानगरपालिका येथे 68 अशा एकूण 1498 सदनिका आहेत.


ही सर्व घरं अत्यल्प, अल्प, मध्यम आणि उच्च उत्पन्न गटांसाठी उपलब्ध आहेत. इच्छूकांनी 10 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी 5 वाजेपासून ते 11 जानेवारी 2021 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत https://lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी करावी, असे म्हाडाकडून सांगण्यात आले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार