सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोना काळात लोकप्रतिनिधीनीं सामाजीक भान ठेऊन वागावे  - आमदार महेश लांडगे

महिला बचत गटांना योग्य दिशा व संधी देण्यासाठी कटिबद्ध

Sudarshan MH
  • Feb 25 2021 5:47PM
कोरोना काळात लोकप्रतिनिधीनीं सामाजीक भान ठेऊन वागावे  - आमदार महेश लांडगे  
महिला बचत गटांना योग्य दिशा व संधी देण्यासाठी कटिबद्ध  ;    बचत गटांचा वापर केवळ राजकीय फायद्यासाठी 
 पिंपरी चिंचवड़ " कोरोना परिस्थिती गंभीर होत असून सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे.माझ्यामुळे माझ्या सर्व कुटुंबाला कोरोना झाला होता. लोकप्रतिनिधी असल्याने नागरिकांची सुरक्षितता हीच सर्वात महत्वाची आहे ," हे अनुभवाचे बोल आमदार महेश लांडगे यांनी 
भोसरी येथे निखिल बोऱ्हाडे सोशल फाउंडेशनच्या वतीने आयोजित महिला बचत गटांच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले. मोशी परिसरातील २१ महिला बचत गटांचा उदघाटन कार्यक्रम कोरोनाचे सर्व नियम पळून शिस्तबद्द रित्या आयोजित करण्यात आला. परिसरातील शेकडो महिला मास्क सॅनिटायझर चा वापर करत सोशल डिस्टंसिंग पाळून या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. कार्यक्रमस्थळी सर्वांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. परिसर पूर्णपणे सॅनिटाईझ करण्यात आला होता अशा पद्धतीने कोरोना संसर्गाची काळजी घेऊन हा कार्यक्रम पार पडला.   
 "महिला मुळातच सक्षम असतात,पण बचत गटांच्या नावाखाली अनेकदा त्यांची फसवणूक होते. बचत गटांचा वापर केवळ राजकीय फायद्यासाठी करून घेतला जातो अशा प्रकारांना आळा बसायला हवा. बचत गटांना स्वयंपूर्ण करण्यासाठी योग्य मार्गदर्शन व संधी देण्याची गरज असून त्यासाठी फाउंडेशन कार्यरत आहे.महिला भगिनींनी बचत गट केवळ वर्षभरापुरते न चालवता त्या माध्यमातून स्वयंरोजगार उभा करून आत्मनिर्भर होण्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. तात्पुरत्या स्वरूपात चालवलेल्या बचत गटांमुळे महिला भगिनींचे नुकसानच होते आणि अनेकदा त्यांची फसवणूकही होते असे प्रकार टाळण्यासाठी आम्ही महिलांना योग्य प्रशिक्षण योग्य मार्गदर्शन देणार असून शेवटपर्यंत त्यांच्या बचत गटांच्या मागे ठामपणे उभे राहू," असे आश्वासान निखील बोऱ्हाडे यांनी दिले. 
  " प्रत्येक स्त्री मध्ये उद्योग व्यवसाय करून आर्थिकदृष्ट्या आपले घर व कुटुंब घडवण्याची धमक असते.त्यासाठी कोणावर अवलंबून न राहाता व कुणाशीही तुलाना न करता आपलं स्वतंत्रअस्तित्व निर्माण करायला हवं. म्हणूनच महिलांना घरची लक्ष्मी असे म्हंटले जाते.वडिलांच्या निधनानंतर घरातील ३ महिलांनी कशाप्रकारे न खचता संघर्ष केला " याचा अनुभव सिनेअभिनेत्री तेजस्विनी पंडित यांनी उपस्थितांना सांगितला.
महेश लांडगे यांनीही कार्याचे कौतुक करून महिलांच्या संघटनात्मक कार्यासाठी आखलेल्या नियोजनबद्ध योजनेसाठी सर्वोतोपरि मदत करणार असल्याचे आश्वासन दिले. बोऱ्हाडे कुटुंब मुळातच जनसेवेसाठीच जन्माला आलंय, नगरसेवक म्हणून राजकारणात मला संधी मिळाली ज्यात महिला भगिनींचा सिंहाचा वाटा आहे. तसेच आजवर माझ्या संपूर्ण कार्यकाळात महिला भगिनी व बचत गटांमुळे अनेकदा मदतच झाली आहे, सांगली पूरपरिस्थिती दरम्यान सर्वात जास्त मदत महिला बचत गटांच्या माध्यमातून झाली त्यामुळेच तब्बल ८० ट्रकभरून मदत पूरग्रस्त नागरिकांना आपण करू शकलो. 
माजी उपमहापौर शरद बोऱ्हाडे यांनी सर्व उपस्थित पाहुणे व महिलांचे आभार व्यक्त केले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार