सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नेव्ही अधिकाऱ्याचे चेन्नई विमानतळावरून अपहरण करून पालघरच्या तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात नेऊन जिवंत जाळले

चेन्नई विमानतळावरून अपहरण करून

Sudarshan MH
  • Feb 7 2021 6:11AM
 
 
पालघर - चेन्नई विमानतळावरून अपहरण करून कारने तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात नेऊन नेव्ही अधिकारी सुरजकुमार मिथिलेश दुबे(वय-27, रा. झारखंड, रांची) यास 5 फेब्रुवारी रोजी पेट्रोल टाकून जिवंत जाळले.  दरम्यान होरपळलेल्या दुबेची माहिती स्थानिकांनी दिल्यानंतर घोलवड पोलिसांनी त्याला आगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी मुंबईतील रुग्णालयात हलविल्यांनंतर तेथे शनिवारी त्याचा मृत्यू झाला.
 
  इंडियन नेव्हीत 2001 साली सिबिंग सीमॅन पदी रुजू झालेला मिथिलेश दुबे 31 जानेवारी रोजी चेन्नई विमानतळावर पोहचला. तेथे तीन अज्ञातांनी त्याचे अपहरण केले. त्याला तीन दिवस चेन्नईला अज्ञात स्थळी कोंडून ठेऊन, त्याच्याकडे 10लक्ष रुपयांची मागणी करण्यात आली. त्याने नकार दिल्यानंतर कार मधून 5 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र-गुजरात सीमेलगतच्या तलासरी तालुक्यातील वेवजी गावच्या पश्चिम घाटातील जंगलात सकाळी नऊच्या सुमारास आणण्यात आले. त्यानंतर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून तिघांनी त्याच्या शरीरावर पेट्रोल ओतून पेटवून दिले. 
 
  दरम्यान दुपारच्या सुमारास जंगलात विवस्त्र होरपळलेल्या अवस्थेतील व्यक्तीला पाहिल्यानंतर, स्थानिकांनी घोलवड पोलीस ठाण्या अंतर्गत वेवजी पोलीस चौकीला खबर दिली. पोलिसांनी तात्काळ दुबे याला डहाणूच्या आगर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.  चौकशी वेळी त्यांनी पोलिसांना जबाबात ही माहिती दिली. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्याला मुंबईत हलविण्यात आले, तेथे त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. तीन अज्ञात अपहरण कर्त्यांविरुद्ध घोलवड पोलीस ठाण्यात कलम 307, 364, 392 आणि 34 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  गुन्ह्याचा अधिक तपास या ठाण्याचे प्रभारी अधिकारी कुंभार करीत आहेत.
 
   

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार