सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गोखीवरे येथील सरकारी जमिन सर्वे नंबर 41 क्षेञ 0.69.0 या जागेवर शासनाच्या फलक तात्काळ न लावल्यास आंदेालनाचा इशारा- परेश घाटाळ

शासनाच्या फलक तात्काळ न लावल्यास आंदेालनाचा इशारा- परेश घाटाळ

Sudarshan MH
  • Jan 19 2021 7:35PM
 
वसई - ( मनीष गुप्ता ) गाव मौजे गोखीवरे येथील सरकारी जमीन सर्वे नंबर 41 क्षेञ 0.69.9 ही जमिन मिळकत
सरकारी जमीन आहे.या जमीनीवर कोणीही इसम बेकायदेशीरपणे अतिक्रमण करू
नये कब्जा करू नये याची दक्षता घेण्याची जबाबदारी संबधीत महसुल प्रशासनाची आहे.मा.जिल्हादंडाधिकारी पालघर यांनी
त्यांच्याकडील दिनांक 25/09/2020 रोजीच्या पञान्वये तहसीलदार वसई यांना पञ पाठवून सदरच्या सरकारी जमीनीवर फलक लावणेबाबत योग्य ती कारवाई करणेबाब्त कळविले आहे त्या अनुषंगाने बहुजन महापार्टीचे जिल्हाध्यक्ष परेश घाटाळ यांनी 19/10/2020 रोजी
तहसीलदार वसई यांना पञ देऊन सदरच्या सरकारी जमिनीवर कोणीही कब्जा करू नये यासाठी शासनाचा फलक लावण्याची मागणी केली आहे परंतु अदयाप तहसीलदार कार्यालयातून फलक लावण्याचे आदेश पारित झाले नसल्याने सदरच्या सरकारी जमिनीवर काही लोकांचा डोळा आहे व सरकारी जमीन कब्जा करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप बहुजन महापार्टीचे जिल्हाध्यक्ष परेश घाटाळ यांनी केला असून या प्रकरणी तात्काळ फलक लावण्याचे आदेश पारित न झाल्यास आम्हाला आंदेालन करावे लागणार आहे.
आंदोलन केल्याशिवाय प्रशासन जागे हेाणार नाही असे बहुजन महापार्टीचे जिल्हाध्यक्ष परेश घाटाळ यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार