सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोना मृत्यूच सत्य पुढे आलं*

दपक्या आवाजात लोकांमध्ये चर्चा ही होती. की खरंच मृत्यूची संख्या आपल्याला कळते आहे का? माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवल्यानंतर मंगळवारी अखेर राज्य सरकारला अतिरिक्त 1328 कोरोना बळी ची नोंद अधिकृतपणे घ्यावी लागली.

Snehal Joshi .
  • Jun 17 2020 2:47PM
संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या करोना मृत्यू चा गोंधळ हा सगळ्यांच्या लक्षात येत होता. दपक्या आवाजात लोकांमध्ये चर्चा ही होती. की खरंच मृत्यूची संख्या आपल्याला कळते आहे का? माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आवाज उठवल्यानंतर मंगळवारी अखेर राज्य सरकारला अतिरिक्त 1328 कोरोना बळी ची नोंद अधिकृतपणे घ्यावी लागली. मुंबईत 865 आणि अन्य जिल्ह्यातील 466 कोरोना मृत्यू जाहीर करण्यात आले. असे एकूण 1328 मृत्यू हे अधिकचे कोरोनाचे मृत्यू म्हणून आता नोंदले जातील. झाल्या प्रकारावर काय कारवाई केली जाईल. आणि मागील 3 महिन्यांपासून ही आकडेवारी लपविली आहे. त्यावर काय कारवाई होईल यावर प्रकाश टाकावे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली. आणि कृपया याला आकड्यांची फेरपडताळणी असे गोंडस नाव दिली जाऊ नये. दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. असे त्यांची मागणी आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठवून गेल्या तीन महिन्यांपासून काही करोना मृत्यू होऊन सुद्धा ते प्रत्यक्ष आकडेवारी दाखवले जात नसल्याची तक्रार केली होती. ICMR आणि जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनामुळे झालेले मृत्यू कसे नोंदवायचे, त्याचे स्पष्ट दिननिर्देश दिले असल्याने ही कार्यकक्षा डेथ ऑडिट कमिटीची कशी काय होऊ शकते. ही समिती मृत्युसंख्या कमी करण्यासाठी आहे. की मृत्यू संखा दडपण्यासाठी असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. अखेर आज राज्य सरकारने हे 1328 मृत्यू अधिकचे असल्याने मान्य केले. आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आरोपांवर शिक्कामोर्तब झाला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार