सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

पर्यावरणवादी छत्रपती शिवाजी महाराज आणि पर्यावरणपूरक शिवजयंती-नगरसेवक वसंतशेठ बोराटे

पर्यावरणपूरक शिवजयंती-नगरसेवक वसंतशेठ बोराटे

Sudarshan MH
  • Feb 22 2021 6:56AM
 
या महाराष्ट्राचे मर्दानी दैवतं छत्रपती शिवाजी महाराज हे पर्यावरणाचा बारकाईने विचार करणारे होते त्यांची पत्रे आणि अमात्य- रामचंद्रपंत बावडेकर याच्याकडुन लिहुन घेतलेल्या "आज्ञापत्रा"तुन कळते. छत्रपती एका आज्ञापत्रात सांगतात, "लाकूडफाटा तोडू नका. सागाची आणि आंब्याची झाडे अत्यंत उपयुक्त, ती एका सालात पैदा होत नाहीत. त्यांची जोपासना करावी. गडावरील पाला पाचोळा खाली लोटू नका , तो एकत्र करुन खोलगट जाग़ी टाका व त्या ठिकाणी भाजीपाल्याची लागवड करावी...          
...शेतकऱ्यांनी झाडे अनेक वर्षांपासून लेकराबाळांप्रमाणे वाढविलेले असते. ती झाडे तोडली तर शेतकऱ्यांच्या दुःखास पारावार राहणार नाही. ती तोडणे म्हणजे प्रजापीडन आहे. झाड हवे असेल तर जीर्ण झालेले झाड त्याच्या मालकाच्या परवानगीने त्याचा योग्य मोबदला देऊन त्याला आनंदी करून तोडून न्यावे, जबरदस्ती करु नये, भाजीच्या देठांचीही अपेक्षा ठेउ नये" ,झाडं वाचली तरच सृष्टी वाचेल, या दूरदृष्टीतून तब्बल साडेतीनशे वर्षांपूर्वी रयतेच्या या राजानं पर्यावरण संवर्धनाचा संस्कार जनतेमध्ये रुजविला. आज एकविसाव्या शतकात आपण हा संस्कार विसरलोय. वृक्षतोड करून आपणच आपलं भविष्य अंध:कारमय करून टाकलंय, पण शिवरायांच्या या विचारांचा वारसा जपला तो म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील नगरसेवक वसंतशेठ बोराटे यांनी, वसंतसेठ बोराटे यांनी एक अनोख्या संकल्पनेतून दिव्यांग व्यक्तिकडून बनवून घेतले सीडबॉलस..! होय, पर्यावरण संवर्धनासाठी आणि आपलं आयुष्य उजळून टाकण्यासाठी दिव्यांग मुलांनी बनविलेले अनोखे सीडबॉल्स.
 
भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक वसंतसेठ बोराटे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३९१ व्या जयंतीनिमित्त दिव्यांग व्यक्तींनी बनविलेले सीडबॉलचे एकूण ३९१ बॉक्सचे (१२ सीडबॉलस प्रति बॉक्स) मोशीभागात वाटप करून ही शिवजयंती पर्यावरणपूरक शिवजयंती साजरी केली. अशा उल्लेखनिय कार्यातून दिव्यांग व्यक्तींना मदत तर झालीच पण सोबत 'छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीला एक शाश्वत देणगी दिली आहे, ती म्हणजे 'स्वराज्य', अशा या मातीला पर्यावरणपूरक शाश्वत देणं देऊन शिवरायांचा विचार जागवला,'

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार