सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

दोंडाईचा जवळ निमगूळ रस्त्यावरील घटना एसटी बस-दुचाकीचा झालेला अपघातात ; पती पत्नी दोघे जागीच ठार

दोंडाईचा -शिंदखेडा तालुक्यातील निमगूळहून दोंडाईचाकडे जातांना बस व दुचाकीचा अपघात झाला या अपघातात नंदुरबार ता.ओसर्ली येथील पती-पत्नी ठार झाल्याची घटना आज गुरुवार सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान घडली.

Nandurbar MH
  • Aug 26 2021 2:43PM

  
    दोंडाईचा -शिंदखेडा तालुक्यातील निमगूळहून  दोंडाईचाकडे जातांना बस व दुचाकीचा अपघात झाला या अपघातात नंदुरबार ता.ओसर्ली येथील पती-पत्नी ठार झाल्याची घटना आज गुरुवार सकाळी साडेदहा वाजेच्या दरम्यान घडली.

निमगुळ दोंडाईचा रस्त्यावर निमगुळ गावापासून दोंडाईचा कडे जातांना नंदुरबार ता.ओसर्ली येथील रविंद्र मुकुंदर गिरासे वय 60 उजनबाई रविंद्र गिरासे वय 50 रा. ओसर्ली हे दोघे पती पत्नी एम एच 05 ए एल 260 क्रमांकांच्या दुचाकीने दवाखाना व बाजार करण्यासाठी दोंडाईचा कडे जात असताना एम एच 20 बी एल 4045 क्रमांकाची धुळे बडोदा बस व दुचाकीची धडक झाल्याने सदर अपघातात दोघेही गिरासे पती पत्नी हे गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ.अर्जुन नरोटे यांनी मृत घोषित केले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक सचिन गायकवाड, दिनेश मोरे यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. अपघाताची माहिती वाऱ्यासारखी पसरताच नातेवाईक व गावातील मंडळींनी दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयात धाव घेतली व नातेवाइकांनी एकच टाहो फोडला होता.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार