सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन लाच घेताना रंगेहाथ LCB च्या जाळ्यात.

अडीच कोटींचे कर्ज मंजूर करण्यासाठी 15 लाख रुपयांची मागितली होती लाच

Abhimanyu
  • Oct 19 2020 5:49PM

परळी :- वैद्यनाथ बँकेचे विद्यमान चेअरमन अशोक जैन  यांना त्यांच्या परळी येथील निवासस्थानी

औरंगाबाद लाच लुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज दुपारी धाड टाकत त्यांना १० लाख रुपयांची लाच घेतांना रंगेहाथ पकडले असुन या घटनेने मराठवाड्यातील सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

भ्रष्टाचार प्रकरणी वैद्यनाथ बँकेचे चेअरमन अशोक जैन यांच नाव  गेली दोन वर्षापासुन गाजत असुन           

या बाबत अधिक माहिती अशी की वैद्यनाथ बँकेने  कळंब येथील एका किराणा व्यापाऱ्याला अंदाजे अडीच कोटी रुपयाचे कर्ज मंजूर केले होते, या कर्जाच्या मोबदल्यात अशोक जैन यांनी किराणा व्यापाऱ्याकडे १५ लाख रुपयांची लाच मागितली होती . या 15 पैकी १० लाख रूपयांची लाच स्विकारत असताना  जैन यांना आज त्यांचा परळी येथील   निवासस्थानी औरंगाबाद येथील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचुन  रंगेहाथ पकडले आहे. या प्रकरणी परळी पोलीस ठाण्यात जैन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असुन परळी शहर पोलीस पुढील तपास करत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार