सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रझा अकादमीवर बंदी घालण्याची मागणी

नांदेड, अमरावती व मालेगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवून अराजक स्थिती निर्माण करणार्यांवर बंदी घालण्यात यावी

Nandurbar MH
  • Nov 25 2021 8:14PM

तळोदा-
नांदेड, अमरावती व मालेगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडवून अराजक स्थिती निर्माण करणार्यांवर बंदी घालण्यात यावी चिथावणी देणाऱ्या अश्या देशद्रोही रझा अकादमी वर बंदी घालण्यात यावी यासाठी विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या तर्फे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे तळोद्याचे तहसीलदार यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले. त्रिपुरा राज्यातील कथित घटनेच्या निषेधार्थ भिवंडी, मालेगाव, अमरावती व नांदेड आदी ठिकाणी १२ नोव्हेंबरला मोर्चा काढला यातील काही ठिकाणी मोर्च्याच्या वेळी रस्त्यावरील हिंदूंच्या दुकानांची, वाहनांची समाजकंटकां कडून तोडफोड करून आल्याने दंगल आणि दहशतीचे वातावरण निर्माण करण्यात आले. त्रिपुरामध्ये घडलेल्या घटनेचा संदर्भ देत महाराष्ट्र बंद करू पाहणे, मोर्चा काढणे, दुकानांची नसून रोज करणे दहशतीचे वातावरण तयार करणे याचा विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांनी निषेध केला. राज्यात मोर्चे काढून, दगडफेक केली. असे दंगलसदृश वातावरण निर्माण केल्याने तेथील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. दंगलखोर अशा रझा अकादमी तत्काळ बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे. निवेदनावर प्रखंड अध्यक्ष प्रा. राजाराम राणे, दीपक चौधरी, अनिल नाईक, विजय सोनवणे, धनंजय बारगळ, महेश टोपले, डॉ. शांतीलाल पिंपरे, संजय जावरे, छोटू कलाल, भूपेंद्र बारी, मुकेश जैन, पवनकुमार शेलकर, पवन सोनवणे आदींची नावे आहेत.

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार