सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

नाशिक रेमडेसिवीर काळाबाजार प्रकरणात कमला लाइफ सायन्स कंपनीची भूमिका "तो मी नव्हेच"

नाशिक येथे आडगाव पोलिसांनी कमला लाइफ सायन्सेस कंपनीच्या दोन आजी कामगारांना अटक

Sudarshan MH
  • May 26 2021 10:02AM

तर काही स्थानिक मिडीयामधून कंपनी समर्थनार्थ पेड न्यूजचे प्रसारण

समाज माध्यमांवर कंपनी प्रशासनाविरोधात जोरदार टीका


याप्रकरणी नि:पक्ष तपासणी व्हायला हवी अशी मागणी जोर धरत आहे




नाशिक येथे आडगाव पोलिसांनी कमला लाइफ सायन्सेस कंपनीच्या दोन आजी कामगारांना अटक केल्यानंतर काळ्या बाजारात विकल्या जाणाऱ्या रेमडेसिविर बाबत कंपनी प्रशासनाने आज प्रसिद्धीपत्रक काढत या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगत चक्क हात वरती केले आहेत.

     
आडगाव पोलिसांनी नाशिक येथील काळा बाजारात विकल्या जाणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शन याबाबत कारवाई करताना बोईसर येथील रेमडेसिविर इंजेक्शन बनवणाऱ्या कमला लाईफ सायन्सेस कंपनीतील कामगारांना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून 65 पेक्षा जास्त इंजेक्शन सापडल्यानंतर त्यात अनेक इंजेक्शन्स विना लेबल तर काही इंजेक्शन लेबल लावलेले सापडले होते. नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास करता त्यांना नाशिक येथील काही आरोपी व कमला कंपनीतील एकूण 3 कामगार ताब्यात घेतले आहेत.त्यात 1 माजी 2 आजी कामगार सापडल्यानंतर कंपनी प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हे इंजेक्शन्स चोरून नेण्यास कामगार यशस्वी झाले.अशी चर्चा सध्या नागरिकांमध्ये जोर धरू लागली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील कमला लाइफ सायन्सेस कंपनी प्रशासनाच्या विरोधात वातावरण तापायला लागल्यानंतर कंपनी प्रशासनाने एक प्रसिद्धी पत्रक काढत या प्रकरणाची कंपनीचा काही संबंध नसल्याचे थातूरमातूर उत्तरे देऊन या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. कोरोना काळात सोशल अंतर पाळत कंपनीचे काम सुरू असल्याचे कारण देत कंपनी गेटवर सिक्युरिटी विभागाकडून तपासणी न झाल्याने सदर कामगार चोरी करण्यात यशस्वी झाले असे कंपनी प्रशासनाने प्रसिद्धीपत्रकात मान्य केले आहे.

या काळाबाजार प्रकरणात बोईसर येथील स्थानिक नेता तसेच ठाण्यातील काही नेतेमंडळींच्या आशीर्वादाने हे प्रकरण सुरू असल्याची चर्चा सध्या सोशल माध्यमात सुरू आहे.
14 मे रोजी आडगाव येथे काळाबाजार बाबत पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर 16 मे रोजी पालघर ग्रामीण रुग्णालयाला बांधकाम करण्यासाठी कमला लाईफ सायन्सेस या कंपनीने सीएसआर फंडातून एक कोटी वीस लाख दिल्याने कंपनीच्या कारभाराविषयी गढूळ वातावरण तयार झाले आहे.

जिल्हाधिकारी डॉ माणिक गुरसळ यांनी कमला लाईफ सायन्सेस कंपनी कडून आधीच ग्रामीण रुग्णालय बांधून देण्याची परवानगी मागितली असल्याचे सांगितले. सध्या सुरू असलेलं प्रकरण व ग्रामीण रुग्णालय बांधकाम प्रकरण एकत्र करू नये. मात्र जर ते ह्या प्रकरणात दोषी असतील तर त्यांच्यावर अन्न व औषध प्रशासन यांच्याकडून योग्य ती कारवाई करण्यात येईल.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार