सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

भंगार स्पेअर पार्ट पासून तयार झाला आचार्य विनोबांचा पुतळा

सेवाग्राम विकास आराखड्या अंतर्गत होणार स्थापन... जे जे आर्टच्या प्रयत्नातून वेस्ट बनले बेस्ट

Snehal Joshi
  • Jul 13 2020 11:38PM
वर्ध्यात सेवाग्राम विकास आराखडा अंतर्गत गांधीजी आणि आचार्य विनोबाजी भावे यांचे भंगार ठरलेल्या गाडीच्या स्पेअर पार्टपासून पुतळा बनविण्याचे काम सुरू होते.त्यातील आचार्य विनोबा भावे यांच्या 19 फूट उंच पुतळ्याचे काम पूर्ण झाले आहेय. आणि लवकर त्यांची स्थापना होणार आहे.आटोमोबाईल म्हणजेच जुन्या गाड्यांच्या भंगारातून आचार्य विनोबा भावे यांची आकर्षक प्रतिकृती तयार झाली आहे.गाडीचे छोट्यात छोटे भंगार असलेले स्पेअर पार्ट आणि त्याला जे जे स्कूल ऑफ आर्ट च्या हातांची मिळालेली जोड सर्वोदयी विचारांना पर्यटकांसमोर सादर केली गेली आहे. भंगार पासून झालेले पुननिर्मान म्हणजे गांधी-विनोबांच्या विचारांना चालनाच ठरत आहे.भूदान चळवळीचे प्रणेते विनोबा भावे यांचा १९ फूट उंच पुतळा तयार झाला आहे.त्याला बनविण्यासाठी 20 टन भंगारचा वापर करण्यात आला आहे.विनोबाजीचा पुतळा तयार करण्यासाठी तब्बल 120 दिवस लागले आहे.लॉकडाउन मध्ये मटेरियल मिळण्यास अडचण निर्माण झाली होती.विनोबाजीच्या पुतळ्याचा पाया 16×20 असा आहे... हा पुतळा ट्रक,कार आणि मोटार सायकल च्या टाकाऊ स्पेअर पार्ट पासून तयार झाला आहे...हा लवकरच पवनार येथील धाम नदीच्या तटावर स्थापन करण्यात येणार आहे. हा पुतळा तयार करण्यासाठी फेब्रुवारी महिन्यात सुरुवात केले. पुतळा तयार करण्यासाठी चार ते पाच महिन्याचा कालावधी लागलेला आहे..हा पुतळा बनविण्यासाठी जे मटेरियल लागले ते सर्व कार, ट्रक, मोटारसायकल चे पार्ट वापरले आहेय.हा पुतळा जवळ जवळ 19 ते 20 फूट आहे.आणि याला बनविण्यासाठी 20 टॅन च्या जवळपास लोखंड वापरण्यात आलं आहेय.. या पुतळ्याला कोणत्याही प्रकारच्या हवेचा किंवा वादळी वाऱ्याचा कोणताही त्रास नाही.या पुतळ्याचा जो पाया आहे तो खूप मजबूत बनविण्यात आले आहे.आणि या पुतळ्याला आपण कुठे लावू शकतो.कारण या पुतळ्याला बनवितांना सर्व प्रकारची काळजी घेण्यात आली आहेय. क्लमॅटिक कंडिशन या पुतळ्याला कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम येऊ नये या करिता या पुतळ्याचा पाया खूप मजबूत बनविण्यात आले आहे.या पुतळ्याचा जर उंचावर लावला फार छान दिसेल. आचार्य विनोबा भावे यांनी देशभरात चालविलेली भूदान चळवळ, आणि जय जगतचा संदेश हा जगाला शिकवण ठरला आहे. आचार्य विनोबा भावे यांचा पुतळा बनवायचा पण तोही भंगारापासून ही संकल्पनाच नामा निराळी ठरणारी आहे....वाहनांचे स्पेअर पार्ट यासाठी गोळा करण्यात आले होते...सुरवातीला पुतळ्याचे डिझाइन करण्यात आले...त्यावर काम करीत सुचलेल्या कल्पनेतून नाविन्यपूर्ण आकर्षक असा पुतळा तयार झाला आहे. पुतळा तयार झाला पण आता धाम नदीच्या तीरावर पुतळा नेमका बसवायचा कुठे ती जागा निश्चित व्हायची आहे. हवेच्या झोताचा अंदाज आणि पर्यटकांना दृष्टीस पडेल असे ठिकाण निश्चित करून पुतळा उभारला जाणार आहे. जय जगत सांगणाऱ्या विनोबांचा हा पुतळा देखील नदी तीरावर शिकवण देणाराच ठरणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार