सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गोमांस निर्यातीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या नंदुरबार शहरात रमजान ईदनिमित्त शेकडो गोवंश कत्तलीसाठी आणले

गोमांस निर्यातीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या नंदुरबार शहरात रमजान ईदनिमित्त शेकडो गोवंश कत्तलीसाठी आणलेले आढळून आले. मात्र लॉक डाऊन असतानाही या गुरांची वाहतूक झाली कशी याचा शोध घेण्याऐवजी त्याची माहिती देणाऱ्या गोरक्षकांनाच शहर पोलिसांनी दम भरल्याचा ऊफराटा प्रकार घडला.

Aishwarya Dubey
  • May 24 2020 9:20PM

नंदुरबार- गोमांस निर्यातीसाठी कुप्रसिद्ध असलेल्या नंदुरबार शहरात रमजान ईदनिमित्त शेकडो गोवंश कत्तलीसाठी आणलेले आढळून आले. मात्र लॉक डाऊन असतानाही या गुरांची वाहतूक झाली कशी याचा शोध घेण्याऐवजी त्याची माहिती देणाऱ्या गोरक्षकांनाच शहर पोलिसांनी दम भरल्याचा ऊफराटा प्रकार घडला.
येथे विशेष उल्लेखनीय हे आहे की मागील रमजान ईद प्रसंगी सुद्धा गोवंश कत्तलीकडे शहर पोलिसांनी दुर्लक्ष केले होते आणि नंदुरबार शहराबाहेरील डम्पिंग ग्राउंड वर मोठ्या प्रमाणात गोवंशाचे अवशेष फेकून दिलेले गोरक्षकांनी उघड केल्यावर मोठी खळबळ माजली होती. यंदाही अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने तशीच कत्तल घडवू दिली जाणार काय? असाा संतप्त प्रश्न केला जात आहे. याबाबत अधिक वृत्त असे की नंदुरबार शहरातील काही मोहल्ल्यांमधील अनेक घरांबाहेर दिनांक 23 मे रोजी अचानक कुठे 3 - 4, कुठे 5 - 7 तर कुठे 8 - 10 गाय-बैल वासरे बंधून ठेवलेले दिसून आले. कुरेशी मोहल्ला, घोडापीर मोहल्ला, रजाक पार्क, अलीसाहेब मोहल्ला आणि अन्य ठिकाणी रमजान ईदच्या पार्श्‍वभूमीवर शेकडो गोवंश अशाप्रकारे कत्तलीसाठी आणून ठेवले असल्याची माहिती प्राप्त झाली. म्हणून नंदुरबार येथील गोरक्षकांनी ताबडतोब धाव घेऊन शनिवार दिनांक 23 मे रोजी रात्री शहर पोलीस ठाणे गाठून माहिती दिली व कत्तल होण्यापासून ते गोवंश वाचवावे, अशी विनंती पोलिस अधिकाऱ्यांना केली. महाराष्ट्र शासन आणि भारत सरकारने वेळोवेळी उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांच्या मार्गदर्शनाखाली गोवंश हत्या आणि तस्करी ला बंदी घालणारे अनेक कायदे नियम लागू केले असून महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा कलम 5, 6, 9, 11, महाराष्ट्र कीपिंग अँड मोमेंट कॅटल इन अर्बन एरिया कंट्रोल एक्ट कलम 3, 13, पशु क्रूरता अधिनियम कलम  11 (1) व अन्य कायदे कलम अन्वये ताबडतोब ही गोवंश हत्या थांबवण्यात यावी, अशी लेखी अर्जाद्वारे मागणी केली. त्याची दखल घेऊन ताबडतोब कारवाई करीत गो तस्करांवर गुन्हा नोंदवण्या ऐवजी शहर पोलिसांनी मात्र संबंधित गोरक्षकांना दम भरला. दरम्यान शहर पोलिसांनी पुढे काय कारवाई केली हे आज रविवार दिनांक 24 मे रोजी सायंकाळपर्यंत कळू शकले नाही. कुठे गुन्हा दाखल झाल्याची माहिती रविवारी सायंकाळपर्यंत देण्यात आलेली नाही. मग गोवंश कत्तली पासून रोखण्याचे काम पोलिसांनी केले किंवा नाही हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. लॉकडाऊन असताना आणि सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त असतानाही मोहल्ल्यांमध्ये कत्तलीसाठी इतक्या मोठ्या प्रमाणात गोवंश कसे काय आणले गेले? याविषयी मोठे आश्चर्यय आणि संतापही व्यक्त केला जात आहे.

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

कोरोना के कारण पीड़ित गरीब लोगो के लिए आर्थिक सहयोग

Donation
0 Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार