सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

निमलष्करी दलाच्या कॅन्टीनमध्ये फक्त स्वदेशीच

केंद्रीय निमलष्करी दलाच्या कॅन्टीनमध्ये केवळ स्वदेशी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट वरून याबाबत माहिती दिली. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जून पासून सुरू होणार आहे.

snehal joshi
  • May 17 2020 8:18PM

केंद्रीय निमलष्करी दलाच्या कॅन्टीनमध्ये केवळ स्वदेशी वस्तू विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विट वरून याबाबत माहिती दिली. या निर्णयाची अंमलबजावणी 1 जून पासून सुरू होणार आहे. 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी आत्मनिर्भर भारत अभियानाची घोषणा केली.  या अहवालाला प्रतिसाद देत गृहमंत्र्यांनी स्वदेशीचा नारा दिला आहे. विविध केंद्रीय सशस्त्र पोलिस कंपन्यांमध्ये जवळपास 10लाख जवान कार्यरत आहे. या जवानांचे कुटुंब मिळून एकूण 50 लाख लोक स्वदेशी वस्तू वापरणार आहेत. देशाला स्वावलंबी बनवण्याच्या पंतप्रधानांच्या स्वप्नाच्या दिशेने हे छोटेसे पाऊल असे समजायला हरकत नाही. असे गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले आहे.

 केंद्रीय निमलष्करी कंपन्यांच्या विविध मुख्यालयात आणि त्यामध्ये 119 मास्टर तर 16 25 सवलतीच्या कॅन्टीन आहेत. लष्करी दलामध्ये अस्तित्वात असलेल्या कॅंटीनच्या धर्तीवर केंद्रीय निमलष्करी दलात 2006 मध्ये या कॅन्टीन ची व्यवस्था करण्यात आली. या कॅंटीनमध्ये घरगुती  वापराच्या सर्व वस्तू सवलतीच्या दरामध्ये मिळतात. मास्टर कॅन्टीन मधून इतर सर्व कॅन्टीन ला वस्तूचा पुरवठा होतो. वर्षाकाठी 28 हजार कोटी रुपये किमतीच्या वस्तू ह्या कॅन्टीन मधून विकल्या जातात...

 स्वदेशीचा हा निर्णय केंद्रीय दलामध्ये  निर्णय लागू होणार...
1) सी आर पी एस (केंद्रीय राखीव पोलीस दल)
2) बी एस एफ (सीमा सुरक्षा दल)
3) असम  रायफल्स
4) एन एस जी (राष्ट्रीय सुरक्षा गार्ड)
5) सी आय एस एफ (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल)
6) आय टी बी पी (भारतीय  तिब्बत  सीमा सुरक्षा दल)

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार