सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

राज्यशासनाने नोकरभरती करुन विद्यार्थ्याना न्याय द्यावा- ॲड ज्ञानेश्वर चेवले

स्वप्निल लोणकर या युवकाची आत्महत्या म्हणजे राज्य सरकारच्या गलथान कारभाराचा बळी. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदार शिरूर अनंतपाळ यांच्या माध्यमातून राज्य शासनाला निवेदन देण्यात आले

s.ranjankar
  • Jul 5 2021 6:16PM
 
 
लातूर: स्वप्निल लोणकर या युवकाची आत्महत्या म्हणजे राज्य सरकारच्या गलथान कारभाराचा बळी.
भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तहसीलदार शिरूर अनंतपाळ यांच्या माध्यमातून राज्य शासनाला निवेदन देण्यात आले असून
स्वप्नील लोणकर या युवकाने एमपीएससी परीक्षा पास करूनही अजून मुलाखत होत नाही आणि त्यामुळे नोकरी लागत नाही या सरकारच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून आत्महत्या केली.
पुर्व परिक्षा, मुख्य परिक्षा, मुलाखत अश्या प्रकारे  उच्च पातळी पार करत एमपीएससी ची तयारी करीत असणारा प्रत्येक विद्यार्थी पुढे जात असतो, त्यानंतर त्याच्या पदरी यश प्राप्त होणार असत! परंतु जर सरकारच्या निष्काळजी धोरणामुळे वर्षामागून वर्ष लोटूनही परीक्षाच होणार नसतील, त्यांच्या मुलाखती रखडणार असतील तर त्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या भवितव्याची होणारी राख रांगोळी याला जबाबदार कोण? हा प्रश्न आज राज्यातले हजारो युवा विचारत आहेत आणि त्यामुळे स्वप्निल लोणकर याची ही आत्महत्या नसून राज्य सरकारच्या गलथान कारभाराचा नाहक बळी आहे अशी भावना आज तमाम युवा वर्गामध्ये आहे.
परंतु मेहनती शिवाय सत्तेत आलेल्या सरकारला या विद्यार्थ्यांच्या मेहनतीची काय कदर असणार. 
भारतीय जनता युवा मोर्चा मागणी करीत आहे की, स्वप्नील लोणकर याच्या कुटुंबीयांना किमान रु २५ लाख इतकी मदत देण्यात यावी आणि सदर विषयात तातडीने ठोस निर्णय करावा अथवा ,भारतीय जनता युवा मोर्चा प्रत्येक मंत्र्यांच्या ठीकठिकाणी गाड्या अडवून जाब विचारेल आणि न्याय मिळेपर्यंत विद्यार्थ्यांच्या सोबत ठामपणे उभे राहून संघर्ष करीत राहील. 
यावेळी भाजयुमो जिल्हाध्यक्ष ॲड ज्ञानेश्वर चेवले, भाजपा तालुकध्यक्ष मंगेश पाटिल, जिल्हापरषदेचे कृषी सभापती गोविंदराव चीलकूरे, जेष्ठ नेते सांगावे साहेब, नवनाथ डोंगरे, शहरअध्यक्ष गणेश सलगरे,नागनाथ चलमले, संतोष डोंगरे, संतोष शेटे, गणेश मोहिते, महादेव बिराजदार, महेश लुले, महादेव सूर्यवंशी, लक्ष्मण पाटील, सचिन सांगावे व सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 
 
 
 
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार