सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सहकारी संस्थांच्या निवडणुका तीन महिने पुढे- बाळासाहेब पाटील

संपूर्ण देशात महाराष्ट्राची कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन सहकारी संस्थाच्या निवडणुका  पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

Snehal Joshi
  • Jun 18 2020 11:14PM
संपूर्ण देशात महाराष्ट्राची कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन सहकारी संस्थाच्या निवडणुका  पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली. देशातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या विषाणूचा संसर्ग राज्यात सर्वाधिक आहे. त्या अनुषंगाने सर्व सहकारी  संस्थाच्या निवडणूका १८ मार्च च्या शासन निर्णयानुसार तीन महिन्यासाठी पुढे ढकलण्यात आल्या होत्या.सध्याच्या कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या गंभीर परिस्थितीचा विचार करता, कोरोना विषाणू संसर्ग टाळण्यासाठी शासनाने ३१ मे रोजीच्या आदेशान्वये राज्याचा लॅाकडाऊन कालावधी ३० जूनपर्यत वाढविण्यात आला आहे. तसेच अद्यापही साथीचा रोग आटोक्यात येण्यास काही अवधी लागणार आहे. त्याचप्रमाणे रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.अशावेळी राज्यातील सहकारी संस्थांच्या  निवडणूका घेणे योग्य होणार नाही. म्हणून महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम ७३ कक मधील तरतुदी नुसार ज्या प्रकरणी  राज्यातील कोरोना या विषाणूचा वाढता प्रादुर्भाव बघता सहकारी संस्थाच्या निवडणुका  पुन्हा तीन महिने पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असल्याची माहिती राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.  

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार