सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

संघ परिसर हाय अलर्ट,जैश ने केली नागपुर संघ मुख्यालयाची रेकी, जैशचा स्लीपर काश्मिरात पकडला.

जैशने संघ मुख्यालयाची रेकीही करून घेतली आहे. रेकी करणारा जैशचा स्लीपर काश्मिरात पकडला गेला. त्याच्या चौकशीतून ही धक्कादायक माहिती नागपूर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

Snehal Joshi .
  • Jan 7 2022 11:08PM

नागपुरातील काही संवेदनशील ठिकाणांची पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदकडून रेकी करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. सेंट्रल एजन्सीकडून पोलिसांना ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महाल परिसरातील मुख्यालयासह (RSS) रेशीम बागमधील संघाच्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसर आणि इतर काही संवेदनशील ठिकाणांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन तिथे सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.

 नागपुरातील संघ मुख्यालयावर हल्ला करण्याचा कट सहा महिन्यांपासून पाकिस्तानात शिजत असून दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने आपल्या स्लिपर मार्फत नागपुरातील संघ मुख्यालयाची रेकीही करून घेतली आहे. रेकी करणारा जैशचा स्लीपर काश्मिरात पकडला गेला. त्याच्या चौकशीतून ही खळबळजनक माहिती पुढे आली आहे.

इंडियन मुजाहिदीन, लष्कर-ए-तोयबासारख्या दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर अनेक वर्षांपासून संघ मुख्यालय आहे. २००६ मध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांनी मोठ्या प्रमाणात स्फोटक भरलेली ॲम्बॅसिडर कार घेऊन मुख्यालयावर हल्ला करण्याचाही प्रयत्न केला होता. मात्र तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी तो हल्ला उधळून लावला होता. त्यावेळी पाकिस्तानी दहशतवाद्यांना पोलिसांनी कंठस्नानही घातले होते. या हल्ल्यानंतर संघ मुख्यालय, नागपूर रेल्वेस्थानक, दीक्षाभूमी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचे वृत्त अनेकदा पुढे आले होते. या पार्श्वभूमीवर संघ मुख्यालय परिसरात केंद्रीय सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. येथे २४ तास सीआयएसएफचे सशस्त्र जवान तैनात असतात.
संघ मुख्यालयाची सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आल्यामुळे गेल्या काही वर्षात कसल्याही प्रकारची अनुचित घटना अथवा इशारा मिळाला नव्हता. मात्र काही दिवसांपूर्वी श्रीनगर (काश्मीर)मध्ये तेथील सुरक्षा दलाने जैश ए मोहम्मदच्या एका स्लीपरला अटक केली. त्याच्या चौकशीतून, सप्टेंबर २०२१ मध्ये तो नागपुरात आला होता आणि त्याने संघ मुख्यालय, रेशिमबागचे स्मृती मंदिर तसेच परिसरातील व्हिडीओ आणि छायाचित्र काढल्याचे कबूल केले. ही माहिती केंद्रीय गृहमंत्रालय तसेच केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी नागपूर पोलिसांना दिल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकाराची पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी गंभीर दखल घेत प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे उपायुक्त चिन्मय पंडित यांच्याकडे सोपविला आहे.

दरम्यान, गुन्हे शाखेचे एक पथक काश्मिरमध्ये जाऊन आले असून त्यांनी स्लिपरकडून करण्यात आलेल्या रेकीसंबंधीची सविस्तर माहिती घेतली आहे. आयुक्तांनी दोन दिवसांपूर्वी संघ मुख्यालय, रेशिमबाग परिसरात जाऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला आणि आजुबाजुच्या परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त नेमला.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना जैशच्या दहशतवाद्यांनी नागपुरात संघ मुख्यालयाची रेकी केली असून आम्ही त्यासंबंधाने कोतवाली ठाण्यात अन लॉ फुल ॲक्टिव्हिटिज ॲक्टनुसार गुन्हा दाखल केल्याचे सांगितले आहे. प्रकरण अतिशय संवेदनशील असल्यामुळे यासंबंधाने सविस्तर बोलता येणार नसल्याचे आयुक्तांनी म्हटले.
शहर पोलीस अलर्ट मोडवर.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय तसेच सभोवतालच्या परिसरात फोटोग्राफी/व्हिडीओग्राफी तसेच ड्रोनद्वारे चित्रीकरण करण्यास नागपूर शहर पोलीस आयुक्तालयाकडून बंदी घातली आहे. फौजदारी दंड प्रक्रिया संहिता १९७३ कलम १४४ (१,३) प्रमाणे हे प्रतिबंध करण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कडक कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार