नंदुरबार, दि. 30 : बिलाडी रोड ईदगाह मैदान परिसरात असलेल्या फायर बटावर 3 व 12 जानेवारी 2022 या कालावधीत जिल्हा पोलीस दलाचे आस्थापनेवरील पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाऱ्यासाठी गोळीबार सराव घेण्यात येणार असल्याने पोलीस अधिकारी-कर्मचारी यांचे व्यतिरिक्त प्रतिबंधीत क्षेत्रात वरील कालावधीत कोणालाही प्रवेश करता येणार नाही. परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील तसेच जिवित अथवा वित्तहानी होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे जिल्हादंडाधिकारी मनीषा खत्री यांनी कळविले आहे.
नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी मो. 8421732333 / 9637732333