सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

कोरोनाने एकाच दिवशी 4 वृद्ध दगावले* *नंदुरबार कोरोना रुग्णांचे सहस्त्रक गाठणार*

कोरोनाने एकाच दिवशी 4 वृद्ध दगावले

Nandurbar MH
  • Aug 23 2020 5:35PM
नंदुरबार - कोरोना बाधीत असलेल्या 4 रुग्णांचा आज एकाच दिवशी मृत्यू झाल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना मृत्यूंची संख्या 61 झाली आहे. नंदुरबार आणि शहादा तालुक्‍यातच सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. नंदुरबारला कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या  रुग्णांची संख्या 849 झाली असून  लवकरच सहस्त्रक  पूर्ण करण्याच्या  उंबरठ्यावर  आले आहे.
आज दि.23 ऑगस्ट 2020 दुपारी 3.30 च्या अहवालानुसार आज एकूण 93 पैकी 27 व्यक्तिंचे कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आले. यात
नंदुरबार-6, शहादा-18, अक्कलकुवा-2, दोंडाईचा-1, असे एकूण-27 जणांचा समावेश आहे. मरण पावलेल्यात शहादा तालुक्यातील 60 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला, नंदुरबार शहरातील 74 वर्षीय आणि तळोदा तालुक्यातील 70 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. यामुळे कोरोनाने मृत्यू झालेल्यांची  एकूण संख्या 61 वर पोहोचली. नंदुरबार येथे चाचणी केंद्र सुरू झाले असल्यामुळे चाचणी अहवाल वेगाने येऊ लागले असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढलेली दिसत आहे. दिवसाला तीनशे ते पाचशे चाचण्या होऊ लागल्या आहेत. जिल्ह्यातील कोविड रुग्णांची संख्या 1660 झाली असून बरे झालेल्यांची संख्या  869 आहे. पैकी एकट्या नंदुरबार शहरातील कोविड रुग्ण संख्या 849 झाली असून यातील 518 बरे झाले आहेत. सध्या 728 रुग्ण उपचार घेत आहेत. दरम्यान जिल्हा अधिकारी डॉक्टर राजेंद्र भारूड यांनी चाचणी अहवाल देण्याला वेग मिळाल्याचा दावा केला. तसेच नंदुरबारला निम्स आणि स्मित, नवापूरला अल्सिफा व अन्य एक आणि चिंचपाडा येथे मिशनऱ्यांचे एक असे एकूण पाच खाजगी अद्यावत कोविड रुग्णालय सुरू करण्यात आल्याची माहिती दिली. आतापर्यंत रक्तपेढीसाठी मायक्रो बायोलॉजीस्ट मिळत नसल्याने प्लाजमा फिल्ट्रेशन सुरू करण्यात आले नव्हते परंतु मुंबई येथून कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर एक मायक्रोबायोलॉजी नेमण्यात आले असल्यामुळे लवकरच प्लाजमा फेडरेशन सुरू होणार असल्याचेही ते म्हणाले.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार