सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सहा महिन्याची घरपट्टी माफ करा अन्यथा नगराध्यक्षांवर अपात्रतेची कारवाई घडवू नंदुरबार भाजपा नगरसेवकांचा थेट रघुवंशी यांना अल्टिमेटम

नंदुरबार भाजपा नगरसेवकांचा थेट रघुवंशी यांना अल्टिमेटम

Nandurbar MH
  • Oct 26 2020 7:19PM

 सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

 नंदुरबार- नगराध्यक्ष काय आम्हाला अपात्र ठरवतील? आम्हीच ठरवले कधी तर स्वमालकीच्या जमिनीशी संबंधीत ठराव पारित केले म्हणून नगराध्यक्षांवरच अपात्र ठरण्याची वेळ आणू शकतो; असे खणखणीत उत्तर भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या वतीने आज देण्यात आले. सहा महिन्याची घरपट्टी माफ करण्याचा निर्णय महिनाभरात घ्यावा अन्यथा भारतीय जनता पार्टी मोठे आंदोलन घेऊन उतरल्या शिवाय राहणार नाही; असा कडक ईषाराही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज पत्रकार परिषदेत देण्यात आला.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, शहरातील उद्योजक तथा नेते प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चौधरी, नगरपरिषदेतील विरोधी गटनेता चारुदत्त कळवणकर, प्रतोद आनंदा माळी यांनी आज सोमवार रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत वरील इशारा दिला. याप्रसंगी भाजपाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी म्हणाले की भाजपाचा एक नगरसेवक तरी अपात्र करून दाखवावा असे खुले आव्हान आम्ही चंद्रकांत रघुवंशी यांना देतो. त्यांनी सहा महिने घरपट्टी माफीचा निर्णय महिनाभरात घेतला नाही तर भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक सर्व जिल्हा पदाधिकारी यांच्यासह नागरिक रस्त्यावर उतरून मोठे आंदोलन छेडतील. नगरसेवक प्रशांत चौधरी, गौरव चौधरी, आकाश चौधरी, कमल ठाकूर, वसईकर व अन्य उपस्थित होते. दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना प्राध्यापक डॉक्टर रवींद्र चौधरी व व विरोधी गटनेते चारुदत्त कळवणकर यांनी रघुवंशी यांनी दाखवलेले ऑनलाइन सभेचे फुटेज तद्दन खोटी असल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले की,आम्ही दिलेले आव्हान पेलता आले नाही म्हणूनच त्यांनी सर्वसाधारण सभेचे तद्दन खोटे फुटेज पत्रकारांना दाखवले. माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन जे फुटेज दाखवलेत ती खरी रेकॉर्डिंग नाहीच. आम्ही मांडलेल्या मुद्द्यांचे आणि घरपट्टी माफी विषयीचे रेकॉर्डिंग नीट झालेलेच नाही हे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांनी स्वतः लेखी पत्रातून कबूल केलेले आहे. त्याचा पुरावा आम्ही येथे पत्रकारांना सादर करीत आहोत. भाजपाच्या मागणीनुसार सहा महिन्यांची घरपट्टी माफ करण्याचा ठराव झालेला असतानाही तसा ठराव झालाच नाही; असे सांगून नगराध्यक्ष सौ रत्ना रघुवंशी यांनी आम्हाला खोटे ठरवण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर घरपट्टी माफ झाल्याचे सांगणारे फलक उतरवा अन्यथा गुन्हे दाखल करू; अशी जाहीर धमकी दिली. स्वतः माजी आमदार रघुवंशी पत्रकार परिषद घेऊन आम्हालाा अपात्र ठरवण्याची धमकी दिली. वस्तविक प्रथम नागरिक व महिला नगराध्यक्षा म्हणून सौ रत्ना रघुवंशी यांचा आदर आम्ही कालही करत होताे आणि आजही तेवढाच करीत आहोत.तथापि सत्य मांडण्याचा आग्रह धरून जे जाहीर आव्हान भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी  दिले ते स्विकारता आले नाही म्हणूनच माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी महिला नगराध्यक्षांना धमकावल्याचा कांगावा सुरु केला. एवढेच नाही तर सर्वसाधारण सभेचे तद्दन खोटे फुटेज दाखवून पत्रकारांसह नागरिकांची दिशाभूल करण्याचा उद्योग मांडला. रघुकुळाची रीत सांगणाऱ्यांना हे साजेसे आहे का? हे माजी आमदार रघुवंशी यांनी स्पष्ट करावे.
 रघुवंशी परिवाराच्या स्वार्थाला किंवा त्यांच्या पंटर लोकांच्या हिताला त्यातून धक्का बसत असेल तर माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी हे लगेच चवताळून उठतात. हा ईतिहास आहे. त्यांना कोणीही विरोध करणारा नको असतो. आताही तेच घडले असून त्यांनी भाजपा नगरसेवकांना अपात्र ठरवू अशी जाहीर धमकी दिली आहे. मागच्या दाराने आमदारकी मिळवणाऱ्या रघुवंशी यांना ही दहशतवादाची भाषा वाटत नाही का? जनतेच्या वतीने मुद्दे उपस्थित केले की नगरसेवकांना थेट अपात्र ठरवायचे ही रीत आहे का? रुग्णांना साधी ऍम्ब्युलन्स पाहिजे असेल तर यांच्या उंबरठ्यावर खेटा घातल्याशिवाय मिळत नाही. लोकहिताची भूमिका कोण घेतं हे यावरून सर्वांना कळू शकते. 
    सत्ताधार्‍यांच्या मालकीची जमीन असेल तर त्याविषयीचे ठराव करू नये असा कुठे कायदा आहे का? असाही प्रश्न रघुवंशी यांनी केला आहे. मग शहरातले अनेक लोक अनेक महिन्यांपासून त्यांची शेत जमीन रहिवासी क्षेत्रात समाविष्ट केली जावी यासाठी खेटा घालताहेत त्यांचे काय? वर्षानुवर्ष त्यांचे अर्ज प्रतीक्षेत का ठेवले जातात? फक्त स्वतःच्या कुटुंबाच्या जमिनीचे ठराव करण्याची घाई करायची व लेआऊट विकसीत करून स्वतःच्या आर्थिक लाभाचे मार्ग मोकळे करून घ्यायचे; ही लोकांची फसवणूक नाही का?  परिवारिक लाभ घेणारी यांची स्वार्थांधता एवढी आहे की विकास कर सुद्धा पालिकेला हे जमा करीत नाहीत. यांची एकंदरीत प्रकरणे लक्षात घेता महाराष्ट्र नगरपालिका अधिनियम 1965 च्या कलम 44 नुसार हे सर्वजण अपात्र ठरू शकतात. हे धक्कादायक वास्तव आहे. आम्हाला अपात्र ठरवण्याची भाषा करून आमच्यावर एक बोट रोखण्यापूर्वी चार बोट आपल्यावर रोखली जात आहेत; याची जाण रघुवंशी परिवाराला दिसत नाही.
   नगराध्यक्ष म्हणतात, घरपट्टी माफ करण्याचा अधिकार आम्हाला नाही. मग छत्रपती शिवाजी नाट्य मंदिर, इंदिरा संकुल, क्रीडा संकुल आदी नगरपालिकेच्या मालकीच्या इमारतींची थकीत घरपट्टी कशी काय माफ केली? चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे की, नगरपालिका अधिनियमानुसार आम्हाला घरपट्टी माफीचा अधिकार नाही मात्र केवळ सूट देण्याचा अधिकार आहे. तर आम्ही त्यांना जाहीरपणे सांगतो की, सूट देण्याच्या याच अधिकाराचा वापर करा आणि 10 टक्के घरपट्टी वसूल करून 90 टक्‍के घरपट्टी सूट द्या. रघुवंशी यांचा यात काय तोटा आहे? स्वतःच्या पंटर लोकांना लाभ देणारी भूमिका घेतात तशी जनतेला लाभ देणारी सुद्धा भूमिका घ्यावी; हा आमचा आग्रह लोकहिताचाच आहे. हे भारतीय जनता पार्टीच्या वतीने पुन्हा आम्ही स्पष्ट करतो.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार