सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

लातूर मनपानिवडणुकीमध्ये 80 टक्के तरूणांना संधी देणार माजी कामगार कल्याण मंत्री तथा आ. संभाजीराव पाटील यांचे प्रतिपादन

भाजपा युवा मोर्च्या व युवा वॉरियर्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संघटन निर्माण केलेले आहे. सामाजिक कार्यामध्ये तरूणांचीच फळी सक्रियपणे काम करीत आहे. या तरूणांच्या संघटनाच्या जोरावर आपण काम करीत आलेलो आहोत. त्यामुळे या कार्यकर्त्यांना काम करताना खाली मान घालण्याची वेळ येऊ देणार नाही. येत्या काही महिण्यावर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकामध्ये 21 ते 35 वयोगटातील व सामान्यातला सामान्य गटातील 80 टक्के तरूणांना संधी देणार असल्याची घोषणा राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री तथा आ. संभाजीराव पाटील यांनी केली.

s.ranjankar
  • Aug 16 2021 2:40PM

लातूर : भाजपा युवा मोर्च्या व युवा वॉरियर्सच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात संघटन निर्माण केलेले आहे. सामाजिक कार्यामध्ये तरूणांचीच फळी सक्रियपणे काम करीत आहे. या तरूणांच्या संघटनाच्या जोरावर आपण काम करीत आलेलो आहोत. त्यामुळे या कार्यकर्त्यांना काम करताना खाली मान घालण्याची वेळ येऊ देणार नाही. येत्या काही महिण्यावर महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे. या निवडणुकामध्ये 21 ते 35 वयोगटातील व सामान्यातला सामान्य गटातील 80 टक्के तरूणांना संधी देणार असल्याची घोषणा राज्याचे माजी कामगार कल्याण मंत्री तथा आ. संभाजीराव पाटील यांनी केली.
यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्च्या लातूर शहर व महात्मा बसवेश्‍वर मंडल युवा मोर्च्या यांच्यावतीने युवा  वॉरियर्स व युवकांचा जाहीर प्रवेशाच्या कोरे गार्डन येथील कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कार्यक्रमाला भाजपा नेते तथा महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणीचे निमंत्रित सदस्य माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर, महाराष्ट्र प्रदेश कार्यकारीणीचे सदस्य शैलेश लाहोटी, भाजपा लातूर शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे,  भाजपा लातूर शहर जिल्हा संघटन सरचिटणीस मनिष बंडेवार, महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतीक सेलचे प्रकोष्ठचे संयोजक तथा लातूर महानरगपालिकेचे सभागृह नेते शैलेश गोजमगुंडे, महाराष्ट्र प्रदेश ओबीसी मोर्च्याचे उपाध्यक्ष तथा माजी उपमहापौर देविदासजी काळे, युवा मोर्च्या प्रदेश कार्यकारीणी सदस्या ललीता जाधव,भारतीय जनता पार्टी युवा मोर्च्याचे प्रदेश सचिव गणेश गोमचाळे, मनपा स्थायी समिती सभापती दिपक मठपती, भाजपा युवा मोर्च्या शहर जिल्हाध्यक्ष तथा मनपा मनरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निळकंठराव पवार, नगरसेविका रागिणी यादव,शोभाताई पाटील  दिग्विजय काथवटे, हानमंत जाकते, गणेश गवारे, भाग्यश्री कौळखेरे, रवी सुडे, मनोज सुर्यवंशी, हवा पाटील, विनोद मालु, ज्ञानेश्‍वर चेवले, सुनिल मलवाड,  गोरोबा गाडेकर, किरण उटगे,  बालाजी शेळके, सुभाषप्पा सुलगुडले, भाजपा महात्मा बसवेश्‍वर मंडळाचे अध्यक्ष संजय गिर, पुनम पांचाळ, महात्मा बसवेश्‍वर मंडल युवा मोर्च्या अध्यक्ष राजेश पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना माजी कामगार कल्याणमंत्री तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले की, कोरोनाच्या काळामध्ये विद्यमान पालकमंत्री तथा वैद्यकीय व सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी कुठलेही आणि कोणतेही काम केलेले नाही. कोरोनाच्या संकटामध्ये अनेकांचे नातेवाईक गेले. त्यांना ऑक्सीजन मिळालेला नाही. रेमडेसीवीरचा काळाबाजार मोठ्या प्रमाणात झालेला आहे. याला जबाबदार कोण? तर याला जबाबदार विद्यमान पालकमंत्रीच आहेत. कोरोनाच्या काळात पाच पटीने मृत्यु झालेले आहेत. कागदोपत्री काहीही आकडा दाखविला तरी मृत्युंची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कोरोना काळात हालगर्जीपणा करणार्‍या पालकमंत्र्यावर मनुष्यवधाचा म्हणजेच 302 गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी बोलताना केली. यावेळी महानगरपालिका सभागृह नेते शैलेश गोजमगुंडे, भाजपाचे माजी शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, शहर जिल्हाध्यक्ष गुरूनाथ मगे आदींनी पक्षाच्या वाटचालीवर विचार मांडले. कायक्रमाच्या प्रारंभी माजी कामगार कल्याण मंत्री तथा आ.संभाजीराव पाटील निलंगेकर, भाजपा नेते तथा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर व इतर मान्यवरांच्या उपस्थित भारतमातेच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत महात्मा बसवेश्‍वर युवा मोर्चा मंडलाची कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. महात्मा बसवेश्‍वर युवा मोर्चा, युवा वॉरियर्सच्या 14 शाखांच्या पदाधिकार्‍यांना नियुक्‍तीपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच असंख्य पदाधिकार्‍यांचा जाहीर प्रवेश झाला. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अब्दुल गालिब शेख यांनी केले. तर आभार भाजयुमोचे सरचिटणीस अ‍ॅड.गणेश गोजमगुंडे यांनी मानले. या कार्यक्रमाला सागर घोडके, गजेंद्र बोकन, वैभ डोंगरे, प्रेम मोहिते, निखील गायकवाड, काका चौगुले, किशोर शिंदे, गणेश श्रीमंगले, विनोद राठी, धनराज राठी यांच्यासह भाजपा युवा मोर्च्या, युवा वॉरियर्सचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार