सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मराठा आरक्षणाच्या मुद्द्याबाबत सखोल माहिती असणाऱ्या विद्वानांची समिती बनवून, त्यांचे मार्गदर्शन घेऊन सर्वोच्च न्यायालयात सरकारने बाजू मांडावी-खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले

सर्वोच्च न्यायालयात सरकारने बाजू मांडावी-खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले

Sudarshan MH
  • Nov 9 2020 12:01PM
नांदेड दि.9(अरविंद जाधव) : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी २००७पासून माझा लढा सुरू आहे. बहुजन समाज हा एका छताखाली, एकत्र यावा, गुण्यागोविंदाने नांदावा, अशी माझी भूमिका आहे. बहुजन समाजाला एकत्र आणायचे असेल, तर मराठा समाजाला आरक्षण मिळणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले.
सकल मराठा समाज व स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या वतीने नांदेड येथे आयोजित मराठा आरक्षण एल्गार मेळाव्यात खासदार छत्रपती संभाजीराजे बोलत होते. अध्यक्षस्थानी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र दादा पाटील होते. कार्यक्रमाचे उद्‌घाटन स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. मंचावर सकल मराठा समाजाचे राज्य समन्वयक सुभाषदादा जावळे, गंगाधर काळकुट्टे, सज्जन सोळंके, राजकुमार पा.सूर्यवंशी, अ.भा. छावाचे प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील, कुणबी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गिरीषभाऊ जाधव, मराठा संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष मनीष वडजे, राष्ट्रीय मराठा सेवा संघाचे तेलंगणा राज्यप्रभारी प्रा.डॉ. गणेश शिंदे, छावाचे प्रदेश कार्याध्यक्ष इंजि. तानाजी हुस्सेकर, स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा प्रा.डॉ. रेणुकाताई मोरे, सुनिता देवसरकर महिला आघाडी जिल्हाध्यक्ष शिल्पाताई पाटील शेडगे मराठवाडा मराठवाडा अध्यक्ष मनोरमा ताई चव्हाण जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष विद्याताई पाटील , प्रियंका ताई कैवारी  मीनाक्षीताई पावडे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड नेत्रसहायक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष डॉ. गजानन माने, 
 संतोष हंबर्डे युवा उद्योजक 
छावा श्रमिक संघटनेचे विभागीय अध्यक्ष भास्कर हंबर्डे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले म्हणाले, मागील अनेक वर्षापासून महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या आरक्षण मागणीचा लढा सातत्याने चालू आहे. महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला १३ टक्के शिक्षण आणि नोकरीत आरक्षण देन्याचे धोरण स्विकारले, मात्र काहींनी मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात याचिका दखल केली आणि मा.सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाला  सर्वोच्च न्यायालयाने स्थिगती दिली. त्यासंदर्भात कायदेशीर लढाई लढण्यासाठी महाराष्ट्र सरकार कुठेतरी कमी पडत आहे, असा आरोप खा.संभाजीराजे यांनी केला. 
मराठा समाजाचा सेवक म्हणून सरकारला आव्हान करतो की, महाराष्ट्रतील मराठा समाज हा सर्वात मोठा समाज आहे. या मराठा समाजाला सर्व समाजाप्रमाणे आरक्षण  देवून न्याय मिळाला पाहिजे.यासाठी न्या. लढाईसाठी सरकारने अभ्यासू वकिलांची नियुक्ती करावी,असे आव्हान त्यांनी केले.
मराठवाड्यातील नव्हे तर संबंध महाराष्ट्रातील बहुजन समाज 18 जाती बारा बलुतेदार यांना सोबत घेऊन खांद्याला खांदा लावून काम करायचे आहे संपूर्ण बहुजन समाज एकत्र व्हायला पाहिजे हीच आपली भूमिका आहे. एमपीएससी परीक्षा मराठा समाजाने का थांबविली? याचा विचार इतर समाजानेही करावा. पूर्वी परीक्षेत पास झालेल्या चारशे वीस उमेदवारांचे भवितव्य का धोक्यात घालता, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केला. सर्वोच्च न्यायालयामध्ये सरकारचे वकील उपस्थित राहत नसतील, जेएडीचे सचिव, अथवा कोणीही नेता, मंत्री उपस्थित राहत नसेल ही बाब दुर्दैवी असून आपल्या सरकारवर विश्वास राहिला नाही, अशी टीका संभाजीराजे भोसले यांनी केली आहे. 
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे तसेच इतर कोणत्याही जातीच्या आरक्षणाला धक्का पोहोचणार नाही,याची पुरेपूर काळजी घेण्यासाठी आणि सर्वोच्च न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळवून देण्यासाठी विद्वान लोकांची समिती स्थापन करण्याची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. सध्या केंद्राने दिलेल्या ईडब्ल्यूएस आरक्षणाचा मराठा समाजाने सध्या उपयोग घ्यावा, एसईबीसीसाठी आपला लढा सुरूच राहील, असे आवाहन संभाजीराजे भोसले यांनी केले.
या मेळाव्याला  महाराष्ट्रातून आलेले सर्व मराठा आरक्षणाचे जिल्हा समन्वयक,सर्व मराठा संघटनाचे पदाधिकारीचा यांचा मोठा सहभाग होता. उपस्थित मान्यवरांनी सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदवत, आरक्षणासाठी पुन्हा एकजुटीने रस्त्यावर उतरण्याची तयारी करा, असे आवाहन केले. प्रास्ताविक आयोजक स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम, तिरुपती भगणुरे  यांनी केले. सूत्रसंचालन सोपान कदम यांनी केले.

अशोकराव चव्हाणांनी समाजातील, योग्य त्या विद्वान लोकांची एक समिती बनवावी. त्यांच्या अभ्यासाचा लाभ, न्यायालयात बाजू मांडताना वकिलांना होऊ शकेल. अधिकारी आणि सरकारने एकदिलाने काम करण्याची आवश्यकता आहे. ती उणीव मागच्या काळात न्यायालयात बाजू मांडताना दिसत राहिली. त्याचा मोठा फटकाही बसला. परंतु यापुढे, त्या चुका टाळत योग्य त्या पद्ध्तीने तयारी करून, कोर्टात समाजाची बाजू मांडली पाहिजे, असे आवाहन खासदार छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी केले.
या मेळाव्यासाठी परिश्रम घेणारे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील कदम यांनी केले आहे. या मेळाव्याच्या यशस्वितेसाठी डॉ. बालाजी पेनूरकर, विलास पा. इंगळे, मंगेश पा.कदम, प्रशांत पा.मुळे, विजय पा.कदम, सुनील पा.कदम, गणेश पा. काळम, शिवाजी पा.जाधव, बालाजी कऱ्हाळे, तिरूपती पा.भगनुरे, बाला पा.कदम, हनमंत पा.वाडेकर, किरण पा.गव्हाणे, शैलेश पाटील, गणेश पा.कल्याणकर, वैभव पा.राजूरकर, प्रकाश पा. घोगरे, शुभम पावडे, अनिल पा.तेलंग, नवनाथ पा.जोगदंड व समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार