सिद्धेश नाईक यांचीप्रदेश सचिव पदी नियुक्ती
प्रदेश सचिवपदी झाली नियुक्ती : वास्को मतदारसंघाची सोपवली जबाबदारी
पक्षाने घेतलेला निर्णय आपण मान्य केलेला असून आपणाकडे वास्को मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. मी तेथे निवडणुकीचे काम करणार आहे, असे सिद्धेश नाईक यांनी यावेळी सांगितले. आपण जरी वास्कोमध्ये निवडणुकीच्या काळात काम करत राहिलो तरी, आपले समर्थक कुंभारजुवे मतदारसंघात पक्षाने दिलेल्या अधिकृत उमेदवारासाठीच काम करतील, असे ही ते बोलले...
पणजी: भाजपचे कुंभारजुवे मतदार संघातील जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक यांची नाराजी दूर झाली असून पक्षाने त्यांना गोवा प्रदेश भाजपचे सचिव म्हणून नियुक्त केले आहे, अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी शुक्रवारी दिली.
पणजी येथील भाजपच्या कार्यालयात आयोजित पत्रकार । परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश सरचिटणीस व माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर व सिद्धेश नाईक उपस्थित होते.
अनेक नेत्यांची भाजपची उमेदवारी आपणास मिळावी अशी अपेक्षा होती. मात्र सर्वांच्या अपेक्षा पूर्ण होत नाहीत. भाजप हा देश प्रथम आणि पक्ष प्रथम या तत्त्वावर चालणारा पक्ष असून भाजपचे नेते कधीच स्वहिताचा विचार करत नाहीत. त्यामुळे पक्षाने ज्यांना उमेदवारी दिली त्यांच्यासोबत राहणे महत्त्वाचे असते. माजी मंत्री दिलीप परुळेकर, जिल्हा पंचायत सदस्य सिद्धेश नाईक, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल होबळे, जि. पं. सदस्य गिरीश उस्कैकर, नावेली येथील सत्यविजय नाईक आदी अनेक नेत्यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, मात्र त्यांना उमेदवारी मिळाली नसतानाही ते पक्षासोबत राहिले आहेत. त्यामुळे आपण पक्षातर्फे आणि भाजपच्या तमाम कार्यकर्त्यांतर्फे त्यांचे अभिनंदन करत असल्याचे तानावडे यावेळी म्हणाले.
विद्यार्थी परिषदेपासून ते युवा मोर्चाचे सरचिटणीस, कुंभारजुवे भाजप मंडळाचे अध्यक्ष, राष्ट्रीय भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अशा अनेक पदांवर त्यांनी काम केलेले आहे.सिद्धेश नाईक यांनी तळागाळात भाजपसाठी काम केलेले आहे. त्यामुळे त्यांनी उमेदवारी मागणे स्वाभाविक आहे. २०१७च्या निवडणुकीत तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी पांडुरंग मडकईकर यांना उमेदवारी देण्याबाबत विचार व्यक्त केला आणि सिद्धेश नाईक यांनी त्याला पाठिंबा दिला
होता. यावेळीही त्यांनी उमेदवारीची अपेक्षा केली होती आणि ती योग्यच होती. कारण ते जिल्हा पंचायत सदस्य आहेत आणि अनेक वर्षे पक्षाचे काम आहे करत आहे. मात्र केंद्रीय निवडणूक समितीने जुने गोवेच्या सरपंच जेनिता मडकईकर यांना उमेदवारी दिली, त्यामुळे सिद्धेश नाईक नाराज होणे सहाजिकच होते. मात्र त्यांनी पक्ष सोडला नाही की बंडखोरीही केलेली नाही, असेही तानावडे यावेळी म्हणाले.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प