सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

*येसीबी च्या जाळ्यात दोंडाईचा येथील पोलीस हवालदार*

दोंडाईचा: येथे नाशिकच्या पथकाने काल रात्री ही कारवाई केली.

Sudarshan MH
  • May 27 2021 10:28AM

१८ हजार रुपयांची लाच घेणार्‍या हवालदारला एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

दोंडाईचा: येथे नाशिकच्या पथकाने काल रात्री ही कारवाई केली. तक्रारदार व त्यांचे नातेवाईकांविरुद्ध दोंडाईचा पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्ह्यात, सदर गुन्ह्याचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करता सदर गुन्ह्यात ब वर्गात समरी पाठविण्यासाठी पोलीस हवालदार विजय शंकरराव मोरे, (वय ५०) यांनी तक्रारदारा कडे दि.25 रोजी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यामुळे तक्रारदाराने नाशिक एसीबीकडे तक्रार केली.

काल रात्री एसीबीच्या पथकाने दोंडाईचा पोलिस ठाण्यात सापळा रचला. तडजोडीअंती 18 हजार रुपये लाचेची मागणी करून ती पोलीस स्टेशनच्या पाठीमागे रिकामे पोलिस कॉटर येथे स्वीकारताना पथकाने हवालदाराला रंगेहात पकडले.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक (वाचक नाशिक) विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप अधीक्षक नरेंद्र पवार, पोलीस निरीक्षक उज्ज्वलकुमार पाटील, पोहवा सचिन गोसावी, पोहवा दिपक कुशारे, पोना एकनाथ बाविस्कर, पोना प्रकाश डोंगरे, चापोकॉ जाधव आदींनी केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार