सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

CRPF वरील हल्ल्याचा मास्टरमाइंड दहशतवादी हंजला अदनान ठार

लष्कर - ए - तोयबाचा दहशतवादी हंजला अदनान याला ठार करण्यात आलं आहे.

Shruti Patil
  • Dec 6 2023 1:48PM

कराचीमध्ये मोस्ट वाँटेड असणारा लष्कर - ए - तोयबाचा दहशतवादी हंजला अदनान याला ठार करण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये २०१५ मध्ये बीएसएफ जवानांवर करण्यात आलेल्या दहशतवादी हल्ल्याचा तो मास्टरमाइंड होता. हंजलाने २०१६ मध्ये पम्पोर येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. या हल्ल्यात ८ जवान शहीद झाले होते, तर २२ जण जखमी झाले होते. तसेच तो २०१५ मध्ये जम्मूमधील उधमपूर येथे बीएसफच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्याचा तो मास्टरमाइंड होता. या हल्ल्यात २ जवान शहीद झाले होते, तर १३ जवान जखमी झाले होते.

पाकिस्तानव्याप्त काश्मीरच्या लष्कर कॅम्पमध्ये भरती झालेल्या नव्या दहशतवाद्यांची दिशाभूल करण्यासाठी हंजलाला पाठवलं जात असे. खासकरुन त्या दहशतवाद्यांशी त्याची भेट घडवली जात असे जे भारतात घुसखोरी करुन दहशतवादी हल्ला करणार होते. अदनानला लष्कर कम्युनिकेशन तज्ज्ञही म्हटलं जात असे. NIA ने या हल्ल्याचा तपास केला होता. ६ ऑगस्ट २०२५ मध्ये त्यांनी चार्जशीट दाखल केली होती. या दोन्ही हल्ल्यांमध्ये हंजला पाकिस्तानात बसून दहशतवाद्यांना आदेश देत होता. जम्मू काश्मीरच्या श्रीनगर आणि पुलवामा येथे आत्मघाती हल्ले घडवण्यात हंजलाचा हात होता.

अदनान अहमद उर्फ हंजला अदनान लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिदचा निकटवर्तीय असलल्याचं बोललं जातं. २ - ३ डिसेंबरच्या रात्री अज्ञात हल्लेखोरांनी ४ गोळ्या झाडून हंजलाला ठार केलं आहे. कडक सुरक्षा असतांनाही हल्लेखोरांनी त्याची हत्या केली. सूत्रांच्या माहितीनुसार, हंजलाला त्याच्या सुरक्षित ठिकाणाच्या बाहेरच गोळ्या घालण्यात आल्या. गोळी लागल्यानंतर त्याला पाकिस्तानी लष्कराच्या कराचीमधील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ५ डिसेंबरला त्याचा मृत्यू झाला.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार