सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

माफी मागणार नाही शिक्षा भोगण्यास तयार - प्रशांत भूषण

ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी  सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागण्यास नकार दिला. त्यावर, न्यायालयाने भूषण यांना त्यांच्या विधानांचा फेरविचार करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला.

Snehal Joshi .
  • Aug 21 2020 10:53PM
मी दयेची याचना करत नाही; न्यायालयाने (शिक्षेबाबत) उदारपणा दाखवावा अशीही माझी मागणी नाही. न्यायालय देईल ती शिक्षा भोगण्यास मी तयार आहे, असे निवेदन सादर करत ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी  सर्वोच्च न्यायालयात बिनशर्त माफी मागण्यास नकार दिला. त्यावर, न्यायालयाने भूषण यांना त्यांच्या विधानांचा फेरविचार करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला. सरन्यायाधीश शरद बोबडे व सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर टीका करणाऱ्या दोन ट्वीटप्रकरणी भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवले असून, गुरुवारी त्यांच्या शिक्षेबाबत न्या. अरुण मिश्रा, न्या. भूषण गवई व न्या. कृष्ण मुरारी यांच्या पीठासमोर सुनावणी झाली. शिक्षेसाठी वेगळ्या पीठासमोर सुनावणी घेण्याची प्रशांत भूषण यांची विनंती न्यायालयाने फेटाळली. भूषण यांच्या फेरविचार याचिकेवरील निकाल लागेपर्यंत शिक्षा ठोठावली जाणार नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. सुनावणीदरम्यान भूषण यांच्या वतीने ट्वीटद्वारे केलेल्या टीकेमागील भूमिका स्पष्ट करणारे निवेदन सादर करण्यात आले. ‘अवमानाचा ठपका ठेवून न्यायालयाने दोषी ठरवल्यामुळे मला प्रचंड वेदना झाल्या. मला शिक्षा होईल, याचे दु:ख नाही पण, माझ्या टीकेचा गैरअर्थ काढला गेला. लोकशाही मूल्ये टिकवण्याच्या दृष्टिकोनातून खुली टीका करणे गरजेचेच होते. न्यायव्यवस्था अधिक सक्षम होईल, या विचारातून माझ्या ट्वीटकडे बघितले गेले पाहिजे. ट्वीट करून मी माझे सर्वोच्च कर्तव्य बजावले आहे’, अशी ठाम भूमिका भूषण यांनी मांडली. भूषण यांच्या निवेदनावर न्यायालयाने त्यांच्या विधानावर फेरविचार करण्यास सांगितले. न्यायालय सांगत असेल तर मी विधानांवर फेरविचार करेन पण, त्यात फारसा बदल होणार नाही. मी न्यायालयाचा वेळ वाया घालवू इच्छित नाही, असे भूषण यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर, प्रत्येकासाठी लक्ष्मणरेषा असते, ती कशासाठी ओलांडता? मी गेल्या २४ वर्षांत एकालाही अवमान केल्याप्रकरणी शिक्षा दिलेली नाही, ही माझ्यासाठी पहिली वेळ आहे, असे न्या. मिश्रा म्हणाले. शिक्षा न करण्याची विनंती ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचे जनहिताचे कार्य मोठे असून त्यांना शिक्षा करू नये, अशी विनंती महान्यायवादी के. के. वेणुगोपाल यांनी न्यायालयाला केली. त्यावर, न्या. अरुण मिश्रा म्हणाले की, भूषण यांनी आपल्या निवेदनाचा फेरविचार केल्याशिवाय शिक्षा न करण्याची विनंती मान्य करता येणार नाही. हे निवेदन बचावात्मक आहे, की चिथावणीखोर हे न्यायालय ठरवेल. भूषण यांच्या संपूर्ण निवेदनाचा एकत्रित विचार करावा मगच (भूषण यांना शिक्षा न करण्याची) भूमिका घ्यावी, असेही न्या. मिश्रा यांनी वेणुगोपाल यांना सुचवले   

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार