सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी सध्या विरोधकांवर टीकांचा सपाटा लावला

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी सध्या विरोधकांवर टीकांचा सपाटा लावला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निलेश राणे यांनी खालच्या पातळीवरच जाऊन टीका केली आहे

Aishwarya Dubey
  • May 20 2020 12:23PM

मुंबई, 20 मे: महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी सध्या विरोधकांवर टीकांचा सपाटा लावला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निलेश राणे यांनी खालच्या पातळीवरच जाऊन टीका केली आहे. एवढंच नाही तर निलेश राणे यांनी ट्वीट करत राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी चक्क 'हिजडा' असा उल्लेख केला. यावरुन तृतीयपंथिय असलेल्या सारंग पुणेकर यांनी निलेश राणे यांना चांगलंच सुनावलं आहे.

'हिजडा' या शब्दाचा अर्थ माहीत नसेल तर तो मी सांगते. पण आपली बालिशबुद्धी जगावा दाखवू नका. जेव्हा नाकात वेसण नसलेलं हलगट सैरवैरा पळतं, तशी तुमची गत झाली आहे. तोंडाला आळा घाला. हिजडा शब्द मागे घ्या नाहीतर योग्य तिथे बाजार उठवला जाईल, असा इशारा सारंग पुणेकर यांनी दिला आहे.

निलेश राणे हे गेल्या काही दिवसांपासून आपल्या विरोधकांवर कडाडून टीका करत आहे. यातूनच निलेश राणे यांनी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली. एवढंच नाही तर त्यांना हिजडा असं संबोधलं. यावरून सारंग पुणेकर चांगल्याच संतापल्या आहेत. निलेश राणे यांनी तृतीयपंथीयांचा अपमान केल्याचं म्हटलं आहे. वंचित, दुर्लक्षित व समाजाने नेहमीच अन्याय केलेला तृतीयपंथी वर्ग आहे. समाज कंटकांकडून तृतीयपंथियांना कायम हिणवलं जातं. मात्र, चक्क माजी खासदार निलेश राणे यांनीही तृतीयपंथियांना हिणवणं चुकीचं आहे. यावरुन सारंग पुणेकर यांनी निलेश राणे यांच्यावर संताप व्यक्त केला आहे.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार