बाबा जहागीरदार यांचे निधन
उमरखेड येथील माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते हाजी सनाउल्लाह जागीरदार उर्फ बाबा जागीरदार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले
उमरखेड येथील माजी नगराध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे नेते हाजी सनाउल्लाह जागीरदार उर्फ बाबा जागीरदार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले ते 78 वर्षांचे होते. 2001 ते 2006 या कालावधीत बाबा जागीरदार उमरखेड नगरपरिषद चे नगराध्यक्ष होते त्यांनी आपल्या कार्यकाळात न्यायप्रिय, शिस्तप्रिय प्रशासन चालविले. शहरात विकासकामे करून नवीन बगीच्यांची निर्मिती करण्यावर भर दिला विकास कामाच्या गुणवत्तेवर लक्ष दिले त्यामुळेच विभाग व राज्य पातळीवर उमरखेड नगर पालिकेला स्वच्छता अभियानाची विविध पुरस्कार मिळाली होती सर्वधर्मसमभाव जोपासणारे म्हणून त्यांची ख्याती होती त्यांच्या मागे मुलगा तीन मुली व मोठा आप्तपरिवार आहे त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी तालुक्यातील हजारो लोकांची उपस्थिती होती.
सहयोग करें
हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प