सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला शिवसेनेचा पाठिंबा

अकाली दलाच्या नेत्यांनी घेतली होती मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंची भेट

Abhimanyu
  • Dec 7 2020 12:33PM

मुंबई : शेतकऱ्यांच्या मागण्यांना समर्थन देत शिवसेना शेतकऱ्यांच्या देशव्यापी बंदला पाठिंबा देत असल्याची घोषणा शिवसेनेचे नेते खा संजय राउत यांनी केली आहे.

अकाली दलाच्या नेत्यांनी काल राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या आणि आंदेलन याविषयी चर्चा केली होती. देशातील विविध पक्ष आणि संघटनांनी शेतकऱ्यांच्या मागण्याला पाठिंबा जाहिर केला आहे.

 

किसान आंदोलनात सहभागी झालेले विविध पक्षाचे नेते उध्दव ठाकरेंच्या सतत संपर्कात आहेत, या पार्श्वभूमीवर शिवसेनेची भुमिका स्पष्ट करताना संजय राऊत म्हणाले की गेल्या 11 दिवसापासुन पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी त्यांच्या मागण्यासाठी राजधानी दिल्लीच्या वेशीवर आंदोलन करत आहेत.

 

कडाक्याच्या थंडीत ही सरकारी दडपशाहीची पर्वा न करता शेतकरी संघर्ष करीत आहे. पंजाब-हरयाणाच्या शेतकऱ्याने अन्नधान्य उत्पादनात नेहमीच मोलाचे योगदान दिले. आज तोच शेतकरी केंद्र सरकारने लादलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात रस्त्यावर उतरला आहे. जीवनमरणाचा लढा म्हणूनच तो सरकारशी दोन हात करीत आहे असेही राऊत म्हणाले, यावर पुढे बोलताना राऊत म्हणाले की , केंद्र सरकारने  11 दिवसांनंतरही या आंदोलनावर तोडगा काढला नाही. त्यामुळे शेतकरी आंदोलकांनी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. हा बंद यशस्वी व्हावा, शेतकऱ्यांच्या मागण्यांचा आवाज जगभरात जावा हीच शिवसेनेची भावना आहे. महाराष्ट्रातील परिस्थिती वेगळी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेना तसेच महाविकास आघाडी सरकारने सतत सकारात्मक, समन्वयाची भूमिका घेतल्याने पंजाब-हरयाणासारखी परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवू शकत नाही. पण पंजाब-हरयाणाचा शेतकरी आंदोलनात उतरला हे केंद्राचे अपयश आहे. शेतकऱ्यांनी केंद्राच्या धोरणांविरुद्ध पुकारलेल्या बंदमागची भावना नाकारता येणार नाही, असं राऊत म्हणाले.

कोरोनामुळे देशच बंद असल्याची स्थिती वर्षभर होती, परंतु या संकटाच्या काळातही देशातील शेतकरी कर्तव्यभावनेने शेतावर राबत होता हे विसरता येणार नाही. त्यामुळे शेतकरी जर आपल्या मागण्यांसाठी एक दिवसाचा बंद करत असतील तर जनतेने स्वयंस्फूर्तीने बंदमध्ये सहभागी होऊन आपल्या अन्नदात्याच्या मागे ठामपणे उभे राहावे, असे आवाहन शिवसेनेतर्फे करण्यात आले आहे.



सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार