सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शरद पवारांचा पहिलाच दौरा रद्द

राष्ट्रवादीची उत्तर महाराष्ट्रात पकड मजबूत होत चालली आहे. अशातच शरद पवार यांनी उत्तर महाराष्ट्राचा दौरा आयोजित केला होता

Aishwarya Dubey
  • Nov 17 2020 8:37AM

माजी मंत्री एकनाथ खडसे भाजपला रामराम ठोकून राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा पहिलाच दौरा खान्देशमध्ये नियोजित करण्यात आला होता. पण, सोमवारी हा दौरा अचानक रद्द करण्यात आला आहे. खान्देशमध्ये पवारांचा हा दौरा काही दिवस पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

एकनाथ खडसे राष्ट्रवादीत दाखल झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रामध्ये भाजपला मोठा हादरा बसला आहे. भाजपच्या शेकडो कार्यकर्ते हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. त्यामुळे हळूहळू राष्ट्रवादीची उत्तर महाराष्ट्रात पकड मजबूत होत चालली आहे. अशातच शरद पवार यांनी उत्तर महाराष्ट्राचा दौरा आयोजित केला होता. या दौऱ्यातून शरद पवार हे भाजपच्या गडात शक्तिप्रदर्शन करण्याच्या तयारीत होते. पण, सोमवारी रात्री उशिरा उत्तर महाराष्ट्राचा दौरा रद्द करण्याची आला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण झाली आहे. 15 नोव्हेंबर रोजी त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.  त्यामुळे त्यांना तातडीनं जळगावमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

रोहिणी खडसे यांना रुग्णालयात दाखल केल्यामुळे एकनाथ खडसे यांनाही क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यामुळेच शरद पवार यांना उत्तर महाराष्ट्रातला नियोजित दौरा हा तुर्तास रद्द करावा लागला आहे.

विशेष म्हणजे, रोहिणी खडसे यांनी देखील भाजपला सोडचिठ्ठी देऊन वडील एकनाथ खडसेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आहेत. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातही त्या सक्रिय आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर त्या निवडणूक रिंगणात होत्या. मात्र, शिवसेनेच्या उमेदवाराकडून त्यांना निसटता पराभव पत्करावा लागला होता. एकनाथ खडसे यांच्यासोबत अलीकडंच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे यामुळे उत्तर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शेकडो भाजप कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहे. जिल्ह्यातील आणखी काही भाजपचे आजी माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे, अशी माहिती खुद्द एकनाथ खडसे यांनीच जाहीरपणे दिली होती. त्यामुळे  शरद पवारांच्या दौऱ्यात हा प्रवेश सोहळा होण्याची शक्यता होती. पण, दौरा रद्द करण्यात आल्यामुळे हे कार्यक्रमही पुढे ढकलण्यात आले आहे. अद्याप राष्ट्रवादीकडून अधिकृतरित्या दौरा रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली नाही. मात्र, एकनाथ खडसे हेच क्वारंटाइन असल्यामुळे शरद पवारांना दौरा पुढे ढकलावा लागणार आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार