सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गोंडगावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार करणार्‍या नराधमास कठोर शिक्षा द्यावी

क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानचे जिल्हा प्रशासनास निवेदन

Sudarshan MH
  • Aug 7 2023 5:17PM


क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठानचे जिल्हा प्रशासनास निवेदन

नंदुरबार- जळगाव तालुक्यातील भडगाव तालुक्यात गोंडगाव येथे नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घुण हत्या करणार्‍या नराधमाला कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी क्षत्रिय मराठा युवा प्रतिष्ठाने केली आहे.

याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, जळगाव तालुक्यातील भडगाव तालुक्यात गोंडगाव येथे एका नऊ वर्षीय मुलीवर झालेल्या अत्याचार करुन हत्येचा निषेध नोंदविण्यात येत आहे. नराधमाने नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची निर्घुण हत्या केली. ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून निषेधार्थ आहे. या निंदणीय घटनेचा समाजातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. एका नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार होवून निर्घुण हत्या होत असेल तर महिला व मुलींच्या सुरक्षित नाहीत. निर्भया घटनेनंतर आतापर्यंत अनेक महिला, युवती व मुलींवर अत्याचार झाले आहेत. तसेच पिडीत मुलींसह युवतींची देखील हत्या केल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या आहेत. या घटनेबाबत तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला होता. आता पुन्हा जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यात गोंडगाव गावात एका नऊ वर्षीय मुलीवर झालेली अत्याचार व हत्येची घटना निषेधार्थ असून असे विकृत कृत्य करणार्‍या व नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार करुन तिची हत्या करणार्‍या नराधमाला कठोर शिक्षा व्हावी. तसेच सदर खटला जलदगती न्यायालयात चालवून दोषी नराधमास त्वरीत शिक्षा व्हावी, अशी मागणी क्षत्रिय मराठा युुवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रविण महेेश मराठे, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक किरण गवळी, राजपूत समाजाचे अध्यक्ष मोहिनीराज राजपूत, भाजपा सहकार सेलचे जिल्हाध्यक्ष भिमसिंग राजपूत, भीम आर्मी जिल्हाध्यक्ष संजय रगडे, वीर भगतसिंग व्यायाम शाळेचे अध्यक्ष संदीप चौधरी, दिनेश माळी, रामा मराठे, पिंटर पाटील, उपेंद्र राजपूत, राजा मराठे, दीपक मराठे, आतिष मराठे, प्रशांत देवरे, भुर्‍या माळी, कृष्णाराजे प्रविण मराठे आदींनी निवेदनातून केली आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार