सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मंत्री सत्तारांनी राजीनामा द्यावा, आम आदमी पार्टीची मागणी

चार मुलांची नावे टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी शासनाकडून दोषी म्हणून जाहीर करण्यात आली आहेत

Abhimanyu
  • Aug 9 2022 9:07PM
मुंबई : भाजपा प्रणित सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांच्या चार मुलांची नावे टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणी शासनाकडून दोषी म्हणून जाहीर करण्यात आली असून याची नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्री अब्दुल सत्तार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे.

या परीक्षेसाठी 2018 मध्ये एकूण 2 लाख 54 हजार 426 विद्यार्थी परीक्षेसाठी पात्र झाले होते. खुल्या प्रवर्गाकडून 500 रु. फीस व मागास प्रवर्गाकडून 250 फी आकारण्यात आली होती. एकूण 16705 विद्यार्थी या परीक्षेत पास झाले होते. त्यापैकी 7880 विद्यार्थ्यांची यादी गैरमार्गाचा अवलंब केल्याचे प्रकाशित झाले आहे. 7550 विद्यार्थ्यांनी गैरमार्गाने आपले मार्क वाढवून घेतले. 293 विद्यार्थी अपात्र होते. त्यांना पात्र दाखवण्यात आला आहे. 87 विद्यार्थी दलालांच्या कॉन्टॅक्ट मध्ये होते. 

 महाराष्ट्रातील माजी मुख्यमंत्री शिवाजीराव निलंगेकर यांना मुलीचा एक मार्क वाढवला म्हणून राजीनामा द्यावा लागला होता. इथे तर पूर्ण नापासांनाच पास करण्याचा प्रकार आहे. त्याचे बक्षीस म्हणून भाजपचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अब्दुल सत्तारांना मंत्री बनवले आहे. नव्या मंत्री मंडळाची सुरुवातच अशी झाली आहे. तर पुढचा पिक्चर कसा असेल याचा महाराष्ट्रातील जनतेने विचार करावा.
 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार