सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन २३ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

आदेशाचे उल्लंघन २३ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल

Sudarshan MH
  • Jun 28 2022 6:23AM

नंदुरबार -जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून तालुक्यातील रनाळे येथे एकनाथ शिंदेंचा पुतळा दहन केल्याप्रकरणी दिपक गवतेंसह २३ शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेनेचे बंडखोर आमदार यांचा निषेध करण्यासाठी रनाळे येथे दि.२६ जुन रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शिवसेनेचे दिपक गवते, सुनील सोनार, सुरेश शिंत्रे, गोकुळ नांगरे, पंडीत नागरे, संतोष पाटील, योगेश सानप, पंकज नागरे, बबलु नागरे,केशव आव्हाड, साहेबराव घुगे,सलीम मिर्झा,जाकीर खाटीक, अनिल गोसावी, मोहन धनगर,दिपक गीते, विनोद पाटील,वामन गाभणे, सुनील पाटील,हर्षल नागरे, अमित गवते, बापू गवते, प्रकाश धात्रक (सर्व रा.रनाळे) यांनी बाजार चौकात एकनाथ शिंदे यांचा पुतळा दहन करून शिवसेनेचे बंडखोर आमदार यांचा निषेध व्यक्त केला.याप्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केले प्रकरणी वरील शिवसेना पदाधिकारी विरोधात नंदुरबार तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तपास हवालदार नरेश गुरव करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार