सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

महामार्गांवरील अपघात अर्ध्यावर आणणार : नितीन गडकरी

रस्ते सुरक्षा विषयावर कंझुमर व्हॉईस पदाधिकार्‍यांशी संवाद

Snehal Joshi .
  • Sep 9 2020 8:21PM
सध्याच्या स्थितीत महामार्गांवर होत असलेल्या अपघाताची सं‘या 2025 पर्यंत अर्ध्यावर आणणार. रस्ते सुरक्षा हे एक मोठे आव्हान आहे. अपघातांची सं‘या कमी करण्यासाठी जनतेमध्ये जनजागृती होणे आवश्यक असल्याचे मत केंद्रीय महामार्ग बांधणी, वाहतूक, परिवहन व एमएसएमई मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. ‘कंझुमर व्हॉईस’ पदाधिकार्‍यांशी ते व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संवाद साधत होते. रस्ते अपघात जास्तीत जास्त कमी करण्यासाठी आणि आमचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आम्ही युध्दस्तरावर काम करीत आहोत. पण यासाठी सर्वच राज्य सरकारांचे सहकार्य आवश्यक आहे, असे सांगताना ना. गडकरी म्हणाले- राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने अपघात नियंत्रण आणि आकर्षक वाहतूक पध्दती यासाठी खूप पुढाकार घेतला आहे. राष्ट्रीय महामार्गावरील अपघात नियंत्रण व अपघात स्थळांच्या निर्मूलनासाठी जागतिक बँक आणि एडीबी यांनी 7 हजार कोटीचे सहकार्य देण्याचे ठरविले आहे. आम्ही प्रस्ताव पाठविले आहे. आम्ही महामार्गांवरील अपघात स्थळे शोधून काढले आहेत. अपघातग‘स्त स्थळांच्या निर्मूलनासाठी भारत सरकारने 20 हजार कोटी खर्च केले आहेत. दरवर्षी 1.5 लाख अपघात होतात यापैकी 53 हजार अपघात महामार्गांवर झाले आहेत. तामिळनाडू सरकारने जागतिक बँकेच्या सहकार्याने अपघात नियंत्रणाची योजना चांगली आहे. या योजनेमुळे 25 टक्के अपघात नियंत्रित झाले आहेत. रस्ते अपघात नियंत्रणासाठी विद्यापीठे, गैरसरकारी सामाजिक संघटना, राज्य शासन आदीचे सहकार्य आवश्यक आहे. या संस्थांची अपघात नियंत्रणासाठी महत्त्वाची भूमिका ठरू शकते, असे सांगून ना. गडकरी म्हणाले- प्रत्येक जिल्हास्तरावर खासदारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठित करण्यात येत असून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे या समितीचे सचिव राहतील. ही समिती अपघात स्थळे शोधून ते निर्मूलन करण्यासाठी संबंधितांकडे पाठपुरावा करतील. एवढेच नव्हे तर राज्य शासनाच्या आणि महानगर पालिकांच्या रस्त्यांवरील अपघाग‘स्त स्थळे शोधून तीही निर्मूलन करण्याची आवश्यकता आहे. या कामासाठी खासदार आणि आमदार दोघांच्याही भूमिका महत्त्वाच्या आहेत. अपघात नियंत्रणात ऑटोमोबाईल क्षेत्राचेही सहकार्य महत्त्वाचे आहे, असेही ते म्हणाले

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार