सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

विधान परिषद निवडणुकीत आमशा पाडवी यांचा विजय दुर्गम भागातील आवाज विधान परिषदेत पोहोचणार

विजय दुर्गम भागातील आवाज विधान परिषदेत पोहोचणार

Nandurbar. MH
  • Jun 21 2022 11:22AM


नंदुरबार - विधान परिषदेच्या निवडणुकीत नंदुरबार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी हे विजयी झाले आहेत. या विजयामुळे अक्कलकुवा, धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील प्रश्न विधान परिषदेत सोडविले जातील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.आमशा पाडवी यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून एकच जल्लोष केला.

मुंबईत २० जुन रोजी सायंकाळी विधान परिषदेच्या १० जागांसाठी मतदान झाले.यानंतर लगेच निकाल जाहीर करण्यात आला. यात भाजपने ५ जागा जिंकल्या.शिवसेना २ व राष्ट्रवादी काँग्रेसने २ जागा राखल्या आहे.तर कॉंग्रेसला फक्त १ जागा जिंकता आली.तर एका जागेवर कॉंग्रेसचा पराभव झाला आहे. यात भाजपचे प्रविण दरेकर,उमा खापरे,राम शिंदे, श्रीकांत भारतीया, प्रसाद लाड विजयी झाले आहेत.शिवसेनेचे सचिन अहिर व आमशा पाडवी जिंकले आहेत.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एकनाथ खडसे, रामराजे नाईक निंबाळकर यांनी विजय मिळवला.कॉंग्रेसचे भाई जगताप विजयी झाले तर दुसरे उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत नंदुरबार शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आमशा पाडवी हे अक्कलकुवा मतदार संघातून अल्पशा मतांनी पराभूत झाले होते.त्यांनी कॉंग्रेसचे नेते तथा विद्यमान आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी यांना जोरदार लढत दिली होती.या कामगिरीची दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व खासदार संजय राऊत यांनी आमशा पाडवी यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली.या निवडणुकीत आमशा पाडवी हे २६ मतांनी निवडून आले. आमशा पाडवी यांच्या रूपाने नंदुरबार जिल्ह्याला शिवसेनेचा आमदार मिळाल्याने शिवसेना नंदुरबार जिल्ह्यात जोमाने वाढेल असे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार