सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शिंदखेडा तालुका दुष्काळ जाहीर करावा निवेदनाद्वारे प्रहारचे तालुकाध्यक्ष पंकज भाऊ यांची मागणी.

शिंदखेडा प्रतिनिधी : तालुका दुष्काळी जाहीर करावा या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री पंकज भाऊ सिसोदिया व त्यांच्यासोबत आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी यांनी निवेदन देऊन मागणी केली.

Nandurbar MH
  • Aug 11 2021 7:39PM

शिंदखेडा प्रतिनिधी :  तालुका दुष्काळी जाहीर करावा या मागणीचे निवेदन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष श्री पंकज भाऊ सिसोदिया व त्यांच्यासोबत आलेल्या पदाधिकारी कार्यकर्ते व शेतकरी यांनी निवेदन देऊन मागणी केली.
शिंदखेडा तालुक्यात मागील चार ते पाच आठवड्यापासून पावसाने दडी मारलेली आहे. भूमातेच्या उदरातून निघालेले पिक अपुऱ्या पावसामुळे लागलेले आहेत. जिरायत शेतीकडे पाहिले तर, जीव कासावीस होतो. अशीच अवस्था बागायत शेतकऱ्यांचीही असल्याने बागायतदार शेतकरी सुद्धा विहिरीतील पाणी तळाला गेल्यामुळे चिंतेत सापडलेला आहे. तालुक्यात एकदाही असा जोरदार पाऊस झालेला नाही. तालुक्यातील नद्या,नाले,तलाव कोरडेठाक पडलेले आहेत. त्यामुळे विहिरींचा पाण्याचा स्त्रोत आटत असताना दिसतो. त्यामुळे जिरायत आणि बागायत शेतकरी प्रचंड प्रमाणात अडचणीत सापडला आहे. एकीकडे कोरोनाचे सावट त्यात उद्योग व्यवसायांना चालना मिळाली नाही. त्यात बँकेचे व सावकारी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्याची आर्थिक कुचंबणा होत असून त्याच बरोबर तालुक्यातील लघु मध्यम आणि इतर पाटबंधारे कोल्हापुरी केटीवेअर इतर प्रकल्पांमध्ये काही ठिकाणी अत्यल्प तर काही कोरडेठाक आहेत. त्यामुळे शेतकरी दोन्ही बाजूने भरडला जात आहे. मागील तीन आठवड्यांपासून सोसाट्याचा वारा वाहत आहे. आकाशी ढगांची गर्दी होत आहे मात्र. तालुक्यात पावसाचा थेंबही नाही. गेल्या आठवड्यात तालुक्यात कळक उन्हामुळे पिके अधिक कोमेजू लागले आहेत. पिकांची अवस्था अत्यंत नाजूक झाली आहे. जिरायत आणि बागायत शेतीत जी काही पिके उभी आहेत. अपुऱ्या पावसाअभावी जेमतेम तग धरत उभी असलेली पिके रोगराईच्या विळख्यात अडकलेली आहेत. त्यामुळे शेतकरी-शेतमजूर त्याचबरोबर सर्वच पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. एकीकडे पावसामुळे हे रान झालेला शेतकरी तर दुसरीकडे काही ठिकाणी गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचे हाल होत असताना दिसते आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता, आर्थिक आधार मिळवून देण्यासाठी शासन दरबारी आपल्या मार्फत दखल घेऊन शिंदखेडा तालुका दुष्काळ ग्रस्त तालुका म्हणून जाहीर करावा अशी मागणी मा. शिंदखेडा तालुक्याचे तहसीलदार श्री सुनील सैंदाणे यांना निवेदन देते समय प्रहार चे तालुकाध्यक्ष पंकज भाऊ सिसोदिया, उपअध्यक्ष सोनूराजपूत  प्रहार दिव्यांग आंदोलनाचे शहराध्यक्ष अमोल भाऊ शिंपी, किशोर सिसोदिया हितेश पाटील पंकज चौधरी कैलास तिरमले सिमाताई बागले राहुल गिरासे शिवाजी कोळी आनंद मोरे महेंद्र भाऊ मराठे, महेश भाऊ चव्हाण, मुकेश भाऊ अहिरे,शेतकरी व कार्यकर्ते उपस्थित होते

नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी - केतन रघुवंशी  मो. 8421732333 / 9637732333

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार