सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मजुरांसाठी विशेष ट्रेन सुटली, पण सामान्य नागरिकांसाठी रेल्वेसेवा अजून दूरच..

घरापासून दूर अडकून पडलेल्या मजुरांच्या मदतीसाठी भारतीय रेल्वे सरसावली आहे.

Sudarshan MH
  • May 2 2020 11:11AM

मुंबई, 1 मे: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन सुरु आहे. मात्र, लॉकडाऊन आणखी दोन आठवड्यासाठी वाढवण्यात आल्याची घोषणा केंद्रीय गृहमंत्रालयाने केली आहे. त्यामुळे या काळात घरापासून दूर अडकून पडलेल्या मजुरांच्या मदतीसाठी भारतीय रेल्वे सरसावली आहे. पण सामान्य नागरिकांसाठी रेल्वेसेवा अजून दूरच आहे. सामान्यांसाठी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

1 मे रोजी कामगार दिनाच्या निमित्ताने देशात विविध राज्यात अडकलेल्या मजुरांसाठी 'श्रमिक स्पेशल रेल्वे गाडी' सोडण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहे. महाराष्ट्रातून स्थलांतरीत मजुरांना घेऊन शुक्रवारी दोन विशेष रेल्वे गाड्या नाशिक स्टेशनहून रवाना होणार आहे. एक भोपाळकडे (मध्य प्रदेश) तर दुसरी लखनौच्या (उत्तर प्रदेश) दिशेने रवाना होणार आहे. दरम्यान पहिली विशेष गाडी तेलंगणातील लिंगमपेल्ली तेथून शुक्रवारी पहाटे पाच वाजता झारखंडच्या दिशेने रवाना झाली.

रात्री 9.30 ला सुटली नाशिक-भोपाळ विशेष ट्रेन

मजुरांना घेऊन जाणारी विशेष ट्रेन नाशिकहून भोपाळकडे रात्री 9.30 ला सुटली. ही रेल्वे नाशिक ते भोपाळ दरम्यान कोणत्याही स्टेशनवर थांबणार नाही. नाशिक रोडहून 343 स्थलांतरित या रेल्वेनं प्रवास करत आहेत. या लोकांची पाण्याची आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली आली आहे. गाडीची स्वच्छता व फुमिगेशन करण्यात आले होते. तसेच सोशल डिस्टन्सचे सगळे नियम पाळून प्रत्येकाला वापरण्याजोगे अतिरिक्त मास्क तसेच फुडपॅक, पाण्याची बाटली वगैरे देऊन निरोप देण्यात आला.

नाशिक ग्रामीणमधूनही अनेक स्थलांतरित येतील. असे 1000 ते 1200 जण या ट्रेनमधून प्रवास करतील. ही ट्रेन पहिली 12 डब्यांची होती पण त्यात 6 डबे अधिक जोडले गेलेत. आता 18 डब्यांची ट्रेन धावेल. पण सामान्य नागरिकांसाठी कोणतीही रेल्वे सध्या धावणार नाही, असं केंद्रीय गृहमंत्रालय आणि रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांनी गर्दी करु नये असं आवाहन करण्यात आलं आहे.

देशात लॉकडाऊनचा कालावधी आणखी दोन आठवड्यासाठी वाढवण्यात आला आहे. त्यामुळे आता मुंबई लोकल सेवाही 17 मे पर्यंतस्थगित करण्यात आली आहे. मुंबईत लोकलसह मेट्रो, सगळ्याच प्रवासी ट्रेन 17 मेपर्यंत बंद राहणार आहेत.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार