सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

रेल्वेने रात्रीचा 10 वाजल्यानंतर प्रवास करताय तर 'हे' 4 नियम लक्षात ठेवाच

रेल्वेमध्ये रात्री 10 नंतर प्रवास करताना तुमच्या हिताचे काही नियम (Train Rules) आहेत. भारतीय रेल्वेचे काही असे नियम आहेत, ज्यांची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची (important ) आहे.

Sudarshan MH
  • Jan 24 2022 12:47PM

 प्रवासाचं स्वस्त आणि वेगवान साधन म्हणून भारतीय रेल्वेची (Indian Railways) ओळख आहे. रेल्वेने प्रवास (traveling ) करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, रेल्वेमध्ये रात्री 10 नंतर प्रवास करताना तुमच्या हिताचे काही नियम (Train Rules) आहेत. भारतीय रेल्वेचे काही असे नियम आहेत, ज्यांची माहिती तुमच्यासाठी खूप महत्त्वाची (important ) आहे. रेल्वेने प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांना हे नियम माहीत नसतात.

जेव्हा तुम्ही रेल्वेमध्ये प्रवास करता, तेव्हा तुम्हाला अनेक नियमांचं पालन करावं लागतं. टीटीईंसाठी (Travelling Ticket Examiner - TTE) सुद्धा रेल्वेची नियमावली आहे. पण तिकीट तपासताना टीटीई (TTE) अनेक नियमांचे पालन करत नाहीत. नियमानुसार टीटीई कोणत्याही कारणाशिवाय प्रवाशांची वारंवार चौकशी करू शकत नाहीत. पण अनेकदा प्रवासी तक्रार करतात की, जेव्हा ते रात्रीच्या वेळी रेल्वेमध्ये प्रवास करत असतात तेव्हा टीटीई वारंवार तिकीट तपासण्यासाठी (Ticket Checking In Trains) येत असल्यामुळे त्यांची व्यवस्थित झोप होत नाही

तुम्ही रात्रीच्या वेळी रेल्वेमध्ये प्रवास करत असाल, तर तुम्हाला विशेष अधिकार मिळतात आणि टीटीईला सुद्धा रात्री तिकीट तपासताना काही नियम पाळावे लागतात. या नियमांमुळे, टीटीई तुम्हाला रात्री त्रास देऊ शकणार नाही.

रेल्वेने रात्रीचा प्रवास करताना अनेकदा प्रवासी झोपलेले असताना टीटीई त्यांना उठवतात, अशा प्रवाशांच्या तक्रारी आहेत. पण, तुम्हाला माहीत आहे का, टीटीई प्रवाशांना रात्री 10 वाजल्यानंतर त्रास देऊ शकत नाही. ते तिकीट तपासण्यासाठी, ओळखपत्र दाखवण्यासाठी रात्री 10 नंतर प्रवाशांना उठवू शकत नाहीत. रात्री 10 वाजण्यापूर्वी टीटीईला हे काम करावं लागणार आहे. उदाहरणार्थ, समजा तुमची गाडी रात्री 8 वाजता आहे, तर टीटीई तुमचं तिकीट रात्री 10 वाजण्यापूर्वीच तपासेल. त्यानंतर ते तिकीट व ओळखपत्रासाठी प्रवाशांना त्रास देऊ शकत नाही. परंतु, काही अत्यावश्यक कारणांमुळे ते प्रवाशांना झोपतून उठवू शकतात. मात्र, तुम्ही 10 वाजल्यानंतरच रेल्वेचा प्रवास सुरू केला असेल, तर अशावेळी हा नियम लागू होणार नाही. रात्री 10 नंतर टीटीई त्या प्रवाशांची तिकिटं पाहू शकतात, ज्यांनी रात्री 10 नंतर प्रवास सुरू केलाय.

याशिवाय, रात्री 11 वाजता अनेक रेल्वेमधील वीजपुरवठा बंद केला जातो. म्हणजेच रात्रीचा प्रवास असेल तर 11 वाजण्यापूर्वी मोबाईल किंवा लॅपटॉप चार्ज करावा लागेल. अनेक गाड्यांमध्ये नाईट चार्जिंगची सुविधा नाही

रेल्वेच्या नियमांनुसार, मिडिल बर्थवर असलेला प्रवासी रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेतच त्याच्या बर्थवर झोपू शकतो. जर एखाद्या प्रवाशाला रात्री 10 वाजण्यापूर्वी मिडिल बर्थ उघडण्यापासून थांबवायचे असेल, तर त्याला थांबवता येईल. तसंच सकाळी 6 नंतर मिडिल बर्थ खाली करावा लागेल, जेणेकरून इतर प्रवाशांना खालच्या बर्थवर बसता येईल.

रेल्वेने रात्रीचा प्रवास करताना सतत टीटीई तिकीट तपासण्यासाठी आल्यामुळे अनेकदा मनस्ताप होतो. पण रेल्वेचे असे काही नियम आहेत, ज्याची तुम्ही माहिती करून घेतल्यास तुमचा प्रवास सुखकर होण्यास मदत होईल.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार