सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

20 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ

20 दिवसांमध्ये डिझेल 10.79 तर पेट्रोल 8.87 रुपयांनी महाग झालं आहे

Aishwarya Dubey ,twitter :@aishwar76156545
  • Jun 26 2020 8:54AM

 सलग वीसाव्या दिवशी इंधनाचे दर भडकले आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यानं नागरिकांच्या खिशाला चांगलीच कात्री बसत आहे. डिझले 17 तर पेट्रोल 21 पैशांनी महाग झालं आहे. दिल्लीमध्ये डिझेलचे दर पेट्रोलला मागे टाकत वेगानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. 20 दिवसामध्ये डिझेलच्या किंमतीत तब्बल 10.79 पैशांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोल 8.87 रुपयांनी महागलं आहे. काय आहेत शहरानुसार पेट्रोल-डिझेलचे आजचे दर जाणून घ्या.

दिल्ली : पेट्रोल- 80.13 रुपये प्रति लिटर, डिझेल- 80.19 रुपये लिटर

मुंबई : पेट्रोल- 86.91 रुपये प्रति लिटर, डिझेल- 78.51 रुपये लिटर

 

 

  कोलकाता : पेट्रोल- 81.82 रुपये प्रति लिटर, डिझेल- 75.34 रुपये लिटर

चेन्नई : पेट्रोल- 80.37 रुपये प्रति लिटर, डिझेल- 77.44 रुपये लिटर

बंगळुरू : पेट्रोल- 82.74 रुपये प्रति लिटर, डिझेल- 76.25 रुपये लिटर

लखनऊ : पेट्रोल- 80.75 रुपये प्रति लिटर, डिझेल- 72.18 रुपये लिटर

 

 

 

पेट्रोल डिझेलच्या भावामध्ये दररोज काहीसा बदल होत आणि दररोज त्याची समीक्षा केली जाते. सकाळी सहा वाजता पेट्रोल-डिझेलचे भाव जारी करण्यात येतात. तुम्ही एसएमएसच्या माध्यमातून सुद्धा पेट्रोल आणि डिझेलचे भाव जाणून घेऊ शकता.

देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जाहीर करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. त्याच वेळी, आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. आपल्याला RSP<स्पेस> पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार