सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

मराठा आरक्षणाचा वाद आता पुन्हा पेटला

आज क्रांती मोर्चा समनव्याकांची नाशकात बैठक पार पडणार आहे

Aishwarya Dubey
  • Sep 10 2020 4:21PM

मराठा आरक्षण (maratha reservation) प्रकरणात सुप्रीम कोर्टात (maratha quota in supreme court) सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान कोर्टाने वर्ष 2020-21 साठी मराठा आरक्षण स्थगित करण्याचा निर्णय दिला आहे. याचे पडसाद आता राज्यभर उमटायला सुरूवात झाली आहे. मराठा आरक्षणाचा वाद आता पुन्हा पेटला आहे. आज क्रांती मोर्चा समनव्याकांची नाशकात बैठक पार पडणार आहे. यामध्ये राज्य सरकारचा निषेध करत थेट गनिमी काव्यानं आंदोलन करणार असल्याची आक्रमक भूमिका घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आक्रमक आंदोलनाची रणनीती आखण्यासाठी नाशिकमध्ये महत्त्वाची बैठक पार पडत आहे. आता आंदोलन गनिमी काव्यानं करणार अशी ठाम भूमिका जाहीर करत राज्य सरकारचाही निषेध केला आहे. या आंदोलनाची पहिली ठिणगी हा नाशिकमध्ये पेटणार असल्याची चिन्ह आहेत. कायदेशीर लढाईसोबत गनिमी कावाही करू असा या बैठकीत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती देण्यात आली आहे.

 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीनंतर सरकारला 3 दिवसांचा अल्टीमेटम देण्यात आला आहे. भूमिका स्पष्ट करा नाहीतर आंदोलन अटळ आहे अशी आक्रमक भूमिका क्रांती मोर्चा समनव्याकांनी घेतली आहे. त्यामुळे आता राज्यात एकीकडे कोरोनाचा धोका असताना दुसरीकडे आंदोलनाचा इशारा दिल्याने परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे.

या अधिकाऱ्यांच्या अंतर्गत पार पडली महत्त्वाची बैठक

1) करणं गायकर (समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा)

2) गणेश कदम (समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा)

3) राजू देसले (समन्वयक, मराठा क्रांती मोर्चा)

4) माधवी पाटील (रणरागिणी, मराठा क्रांती मोर्चा)

5) पूजा धुमाळ (रणरागिणी, मराठा क्रांती मोर्चा

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार