सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सार्वजनिक बँकांतील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा आजही संप

खासगीकरणाच्या विरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’च्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज, गुरुवारी व उद्या, शुक्रवारी असा दोन दिवसांचा संप पुकारला आहे.

Sudarshan MH
  • Dec 17 2021 11:26AM

नगर : खासगीकरणाच्या विरोधात सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या ‘युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन’च्या नेतृत्वाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आज, गुरुवारी व उद्या, शुक्रवारी असा दोन दिवसांचा संप पुकारला आहे. शहरातील यूको बँकेसमोर आज संघटनेने निदर्शने करून केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली, तसेच शिष्टमंडळाने अतिरिक्त जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर यांना निवेदन दिले

 निदर्शनावेळी झालेल्या सभेत बोलताना कॉ. कांतीलाल वर्मा म्हणाले,की संसदेच्या चालू अधिवेशनात बँकिंग कायद्यातील दुरुस्तीचे विधेयक सरकार मांडत आहे. या विधेयकानुसार बँकातील सरकारची मालकी २६ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात येईल. म्हणजेच सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचे खासगीकरण करणे सरकारला सहज शक्य होणार आहे. याविरोधात संप पुकारण्यात आला आहे.

 बँकांच्या तोटय़ाला बँका जबाबदार नसून मोठय़ा प्रमाणावर थकबाकीदार असलेले मोठे उद्योग व कॉर्पोरेट्स जबाबदार आहेत. त्यांचे हेतुपुरस्सर थकीत व बुडीत कर्ज आहे. त्यामुळे बँकांना मोठय़ा प्रमाणावर आपल्या नफ्यातून तरतूद करावी लागते. परिणामी बँका तोटय़ात दिसून येतात. अशा मोठय़ा थकबाकीदारांविरुद्ध सरकार कोणतेही कडक पाऊल उचलत नाही. सरकारनेच अशा कर्जदारांना पळवाट मोकळी करून दिली आहे. दिवाळखोरी जाहीर करून उद्योग व कार्पोरेट ऐशोआराममध्ये  जगत आहेत.  त्यांच्याकडे हा पैसा येतो कुठून? त्यामुळे सरकारच्या या निर्णयाला नागरिकांनीही विरोध करावा.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार