सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

शाळांना कोणतीही फी वाढ करता येणार नाही, सरकारने घेतला मोठा निर्णय

राज्य सरकारने लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांच्या हिताचा आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

Sudarshan MH
  • May 9 2020 11:53AM

मुंबई, 9 मे: राज्य सरकारने लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांच्या हिताचा आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. चालू  शैक्षणिक वर्षात शाळांना कोणतीही फी वाढ करता येणार नाही, याबाबत शिक्षण विभागाने अध्यादेश काढला आहे. शालेय शिक्षण विभागाने हा निर्णय घेऊन  विद्यार्थी आणि पालकांना मोठा दिलासा दिला आहे.

शाळांनी वार्षिक फी भरण्यासाठी विद्यार्थी पालकांना सक्ती करू नये. त्याऐवजी मासिक किंवा त्रैमासिक फी भरण्याचा पर्याय पालकांना देण्यात यावा, असेही निर्देश देण्यात आले आहेत. फी वाढीबाबत पालकांनी तक्रारी केल्या होत्या, त्यानंतर शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणू या आजारास जागतिक महामारी घोषित केलं आहे. या आजाराच्या संसर्गाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम 1897 व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 ची अमंलबजावणी सुरु आहे. त्याचबरोबर राज्यात लॉकडाऊन सुरु आहे. अशी परिस्थिती सुरु असताना शैक्षणिक संस्था, शाळांनी विद्यार्थी आणि पालकांना फीस भरण्याची सक्ती करता येणार नाही. काही शाळा फी भरण्यास पालकांना सक्ती करत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार सर्व व्यवस्थापनच्या शाळांना विद्यार्थी आणि पालकांकडून शाळेची चालू शैक्षणिक वर्षाची आणि आगामी वर्षाची फी जमा करण्याबाबत सक्ती करु नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार