सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

गेल्या 24 तासांत भारतात 4970 नवीन रुग्णांची वाढ

गेल्या 24 तासांत भारतात 4970 नवीन रुग्णांची वाढ झाली तर 134 लोकांचा मृत्यू झाला. यामुळं आता एकूण मृतांच्या संख्या 3163 झाली आहे.

Aishwarya Dubey
  • May 19 2020 9:54AM

19 मे : देशात कोरोनाबाधितांच्या संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता कोरोनाबाधितांचा आकडा एक लाखांहून अधिक झाला आहे. तर, देशात कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. मात्र लॉकडाऊनमध्येही कोरोनाबाधितांच्या आकडा काही थांबत नाही आहे.

देशात लॉकडाऊनच्या काळातच कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली आहे. 25 मार्चपासून सुरू झालेल्या लॉकडाऊनचा आता सध्या चौथा टप्पा सुरू आहे. त्यावेळी देशात कोरोनाव्हायरसचे 606 रुग्ण होते. त्यानंतर 14 एप्रिलला पहिला लॉकडाऊन संपल्यानंतर 15 एप्रिलपासून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली. त्यावेळी कोरोनाबाधितांच्या संख्या 11 हजार 439 झाली. दुसरा लॉकडाऊन 3 मेपर्यंत चालला. यादरम्यान रुग्णांची संख्या 42 हजार 533 झाली. तर तिसरा लॉकडाऊन 17 मेला संपला. केवळ 12 दिवसात भारतात तब्बल 50 हजार नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. आता चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन मे अखेरपर्यंत लागू करण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत भारतात 4970 नवीन रुग्णांची वाढ झाली तर 134 लोकांचा मृत्यू झाला. यामुळं आता एकूण मृतांच्या संख्या 3163 झाली आहे.

भारतानं एक लाखांचा आकडा पार करत त्या 11 देशांमध्ये समावेश केला आहे जिथे 1 लाखांपेक्षा जास्त बाधित आहेत. पण Active रुग्ण असलेल्या 7 देशांमध्येही भारताचा समावेश होणार आहे. स्पेन (Spain), इराण (Iran)सह फक्त चार देशांमध्येच भारतापेक्षा जास्त रुग्ण आहेत. मात्र तिथे Active रुग्णांची संख्या कमी आहे.

1 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण

लॉकडाऊन 4.0च्या पहिल्याच दिवशी कोरोना रुग्णांची संख्या 96 हजार 169 झाली. तर दुसऱ्या दिवशी भारतानं एक लाखांचा आकडा पार केला. देशात सोमवारी कोरोनामुळं मृत झालेल्या लोकांची एकूण संख्या 3029 झाली. तर, कोरोनाबाधितांचा आकडा आता 96 हजार 169वर जाऊन पोहचला होता. रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत 5242 नवीन प्रकरणं समोर आली होती. तर, 157 लोकांचा मृत्यू झाला होता.

ICMRने केले नियमात बदल

इंडियन कॉउन्सिल ऑफ मेडिलक रिसर्चनं (ICMR) कोरोना तपासणीच्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहे. आता प्रवासी मजूर, रुग्णालयात असलेले कोरोना रुग्ण आणि फ्रंट लाइनवर काम करणारे लोकांच्या तपासणीसाठी नियमाद बदल करण्यात आले आहेत. ICMRने सोमवारी सांगितले की प्रवासी आणि घरी परतणाऱ्या लोकांमध्ये जर इन्फ्लूएन्झा सारख्या आजाराची लक्षणं दिसली तर सात दिवसांच्या आत त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांना किंवा फ्रंट लाइनवर काम करणाऱ्यांमध्ये इन्फ्लूएन्झा सारख्या रोगाचे (ILI) लक्षणं दिसल्यास त्यांची ही RT-PCR चाचणी केली जाणार. याव्यतिरिक्त, एखाद्या संक्रमित रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या आणि अंत्यत गंभीर परिस्थिती राहणाऱ्यांना, ज्यांना लक्षणं दिसत नाहीत, यांच्यावर संपर्कात आल्यानंतर पाचव्या आणि दहाव्या दिवसाच्या दरम्यान तपासणी केली जाईल.

 

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार