सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

'आझाद हिंद सेने'च्या शौर्यगाथाला उजाळा 'राईड फॉर यूनिटी

'आझाद हिंद सेने'ने मातृभूमिच्या दिशेने कुच केली होती. या घटनेला 76 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत सेनेच्या शौर्यगाथेला उजाळा देण्यासह सांस्कृतिक, भौगोलिक समरसतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एका आगळ्यावेगळ्या 'राईड फॉर यूनिटी' चे आयोजन करण्यात आले आहे.

स्नेहल (H. M)
  • Oct 16 2020 11:44AM
पारतंत्र्याच्या जोखडातून भारताला मुक्त करण्यासाठी दुसर्या महायुद्धात सुभाष चंद्र बोस यांच्या 'आझाद हिंद सेने'ने मातृभूमिच्या दिशेने कुच केली होती. या घटनेला 76 वर्ष पूर्ण होत असल्याचे औचित्य साधत सेनेच्या शौर्यगाथेला उजाळा देण्यासह सांस्कृतिक, भौगोलिक समरसतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एका आगळ्यावेगळ्या 'राईड फॉर यूनिटी' चे आयोजन करण्यात आले आहे. ईशान्येकडील संस्कृतीची ओळख व्हावी तसेच भारतालगत देशातील सांस्कृतिक सौदर्याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी भारत, थायलंड, म्यानमार, सिंगापूर अश्या 'बाईक राईड'चे आयोजन करण्यात आले आहे. २५ जानेवारी २०२१ ला सुरु होणार्या या यात्रेत तीन टप्प्यांत, २६ दिवसांमध्ये ऐतिहासिक वारसांना भेट देत ९ हजार किलोमीटरचा प्रवास केला जाईल येईल, हे विशेष. प्रवासाचा एक भाग दिल्लीतून (उत्तर भाग) तर, दुसरा भाग मुंबईतून (पश्चिम भाग) सुरु होईल. प्रवासदरम्यान बायकर्सला मार्गातील महत्वाचे स्थान, ऐतिहासिक स्थळांना भेट देता येईल. विशेष म्हणजे भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य गंगाधर टिळकांनी 'गीता रहस्य' ज्या मंडाले तुरुंगात लिहला, हे तुरुंग बघण्याची संधी देखील रायडर्सला मिळेल. विविध भागातील संस्कृती, तरुण तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणार्या संस्थांसोबत सांस्कृतिक देवाणघेवाणाच्या अनुषंगाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना काळात घरात कैद झालेल्या सर्वसामान्यांनी अनलॉक नंतर पर्यटनाकडे कळ वळवला आहे. या पाश्र्वभूमिवर राईड फॉर यूनिटीला उंदड प्रतिसाद मिळत आहे. केंद्र सरकारकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचनांचे प्रवासादरम्यान तंतोतंत पालन करण्यात येईल, अशी माहिती आयोजकांकडून देण्यात आली आहे. इच्छिूकांनी 'झेनिथ लाईव्ह'च्या संकेतस्थळावर www.ZenithHospitality.net संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. इच्छूकांसाठी या गोष्टी महत्वाच्या * सिंगापूर, मलेशिया, थायलंड, म्यानमार, बांगलादेश चा व्हिसा * किमान सहा पाने कोरी असलेली पारपत्राची सत्यप्रत * व्हिसा अप्लिकेशन फॉर्म, १० पासपोर्ट फोटो * कोरोना तपासणीचा वैद्यकीय अहवाल * बॅंक खात्याचे गेल्या सहा महिन्याचे स्टेटमेंट * वाहन परवाना, प्रवास वीमा कागदपत्रे, मेडिसीन, वाहनाची कागदपत्रे * पाच देशांचे मॅन्यूअल, कॅमेरा तसेच इतर महत्वाची कागदपत्रे * रायडर्स जॅकेट, हेल्मेट, बूट, बाईक हॅन्डग्लोज * आंतरराष्ट्रीय वाहन परवाना असा असेल राईड फॉर यूनिटीचा मार्ग *मुंबई-अहमदाबाद-इंदुर-खजराहो-वाराणसी-चंद्रशेखर आझाद पार्क-नालंदा-कोलकाता-सिलीगुडी-गुवहाटी-कोहिमा-इन्फाळ-काले (म्यानमार)-मोन्यवा-मंडाले-बागो-तक (थायलंड)-बॅंकॉक-हुआ हिन-फुकेट-बुकीत कायू हितम् (मलेशिया)-क्वाललंपुर-सिंगापूर दिवसांनूसार प्रवासाचे टप्पे * दिल्ली/मुंबई/बंगळुरु ते इन्फाळ (७ दिवस) * इन्फाळ ते बॅंकॉक (८ दिवस) * बॅंकॉक ते सिंगापूर (८ दिवस)

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार