सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

हदगाव येथील आगपिडीत कुटुंबाला उद्देश ची मदत आणखी मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज

आणखी मदतीसाठी दानशूर व्यक्तींनी पुढे येण्याची गरज

Sudarshan MH
  • Jan 24 2021 10:59AM
 
 हदगाव दि.२४(अरविंद जाधव) शहरातील अण्णा भाऊ साठे चौक अहिल्या नगर हदगाव येथील शेतकरी गणपतराव केदुजी डुरके यांचे मातीच्या जुन्या घरावर लाकडी माळवंद आहे.अकरा जानेवारी रोजी रात्री घरात विद्युत शार्टसक्रीट ने लागलेल्या आगीत दोन दिवसांपूर्वी विकलेल्या सोयाबीन च्या तिनं लाख रक्कमेसह अन्नधान्य व घरातील दागीने व जिवनाश्यक भांडी व घरातील सर्व साहित्यासह सहा लाख रुपये नुकसान झाले असल्याने अडचणीत सापडले असून महसूल विभागाने पंचनामा केला असुन अद्याप कोणताही मदत मिळाली नसुन कुटुंब सध्या परीस्थिती मुळे डबघाईस आले असल्याने नाईलाजाने त्यांना नातेवाईकांच्या घरी राहून दिवस काढावे लागत आहेत. निवडणूकीत मतासाठी फिरणारे नगरसेवक लोकप्रतिनिधी यांनी अशा ठिकाणी मदत करणे किंवा शासनाकडे मदतीसाठी पाठपुरावा करणे गरजेचे होते.पण त्यांनी या कुटुंबाला भेट ही देण्याचे विसरून गेले असल्याने या कुटुंबाला शासन मदत येईपर्यंत काहीच पर्याय नसल्याने अडचणीत आले आहेत.
 हदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर डुरके यांनी बरडशेवाळा येथील प्रभाकर दहीभाते यांच्या माध्यमातून तालुक्यात अनेक ठिकाणी निस्वार्थी पणाणे मदत करणा-या नांदेड येथील साईप्रसाद परीवार उमरखेड येथील उद्देश सोशल फाउंडेशन ला माहिती देण्यात आली.उमरखेड येथील उद्देश सोशल फाउंडेशने चे अध्यक्ष दिपक ठाकरे , अमोल जाधव, अरविंदराव सुर्यवंशी पवन शहाणे,अनील महानुळे, यांनी शनिवारी २३ रोजी डुरके यांच्या घरी जाऊन कुटुंबाची भेट घेऊन माणुसकीचे नाते जपत दिलासा देऊन जिवनावश्यक वस्तू व रोख मदत देऊन सामाजिक बांधिलकी जोपासली. डुरके कुटुंबाचे नुकसान मोठ्या प्रमाणात झाले असल्याने कुटुंब उघड्यावर असल्याने म दानशूर व्यक्ती सह शासनाने तातडीने मदत करणे गरजेचे आहे.
यावेळी उमरखेड येथे मागील काळात पोलिस निरीक्षक म्हणून कर्तव्य पार पाडत हदगाव येथे कार्यरत असलेले सामाजिकतेसाठी नेहमी चर्चेत असणारे पोलिस निरीक्षक हनुमंतराव गायकवाड हदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते मारोतराव हुलकाने, प्रभाकर डुरके, प्रभाकर दहीभाते उपस्थित होते.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार