सुदर्शन के राष्ट्रवादी पत्रकारिता को आर्थिक सहयोग करे

Donation

सिद्धिविनायक चौकात घर पेटले; घर सामान जळून खाक

नंदुरबार- शहरातील सिद्धिविनायक चौकातील एका जुन्या इमारतीला घरातील देव्हाऱ्यात लावलेल्या दिव्यांनी पेट घेतला.

Nandurbar MH
  • Dec 29 2020 6:27PM

सुदर्शन न्युज (केतन रघुवंशी ) नंदुरबार 

नंदुरबार- शहरातील सिद्धिविनायक चौकातील एका जुन्या इमारतीला घरातील देव्हाऱ्यात लावलेल्या दिव्यांनी पेट घेतला. यामुळे आगीने रौद्र रूप धारण केले. मंगळवारी दुपारी 12 वाजेच्या सुमारास लागलेली आग नियंत्रणात आणण्यासाठी नंदुरबार नगरपालिकेच्या अग्निशमन बंबा वरील जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले. याच वेळी परिसरातील युवकांनी देखील आग विझविण्यासाठी  आटोकाट प्रयत्न केले. यावेळी घरातील राजपूत कुटुंबांना     तातडीने बाहेर काढण्यात आले. भाजीपाला  विक्रेते राजपूत परिवार या घरात भाडेकरू म्हणून राहत होते. मंगळवार आठवडे बाजार असल्यामुळे या परिसरात मोठ्या प्रमाणावर भाजीपाला विक्रेते आणि  शहरी व ग्रामीण भागातील ग्राहकांची गर्दी असते. इमारतीला लागलेली आग वेळीच नियंत्रणात आल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या दुर्घटनेत कुठलीही जीवित हानी झाली नसून घराच्या नुकसानीचा अंदाज पंचनामा नंतर कळणार आहे. सायंकाळी उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात सिद्धिविनायक चौकातील अग्नि उपद्रव घटनेची नोंद सुरू होती.
 नंदुरबार शहरातील देसाई पुरा भागातील सिद्धिविनायक चौकातील घराला लागलेल्या अग्नि उपग्रहाची फिर्याद सुनिल विनायक दापुरकर यांनी दिली आहे. या घटनेत घरातील लाकडी दरवाजे फर्निचर टीव्ही असे सुमारे एक ते सव्वा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेची शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास श्रीकांत माळी करीत आहेत.

सहयोग करें

हम देशहित के मुद्दों को आप लोगों के सामने मजबूती से रखते हैं। जिसके कारण विरोधी और देश द्रोही ताकत हमें और हमारे संस्थान को आर्थिक हानी पहुँचाने में लगे रहते हैं। देश विरोधी ताकतों से लड़ने के लिए हमारे हाथ को मजबूत करें। ज्यादा से ज्यादा आर्थिक सहयोग करें।
Pay

ताज़ा खबरों की अपडेट अपने मोबाइल पर पाने के लिए डाउनलोड करे सुदर्शन न्यूज़ का मोबाइल एप्प

Comments

संबंधि‍त ख़बरें

ताजा समाचार